Agrowon Podcast : हरभरा बाजारावर सध्या कशाचा दबाव वाढला?

Market Update : सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव आहे. तर हमीभाव ५ हजार ४४० रुपयांपेक्षा हे भाव खूपच कमी आहेत.
Chana
Chana Agrowon

Market Bulletin : मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते.

सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर कापसाचे भाव ८४.६४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर काॅटलूक ए इंडेक्स ९३.३५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारात कापसाची आवक सुरुच आहे.

कापसाची दैनिक आवक १ लाख ७० हजार गाठींच्या दरम्यान होती. तर भावपातळी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Chana
Agrowon Podcast : लसणाचे वाढते भाव किती दिवस टिकतील?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावातच आहेत. सोयाबीन निचांकी १२.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयपेंड ३५७ डाॅलरवर पोचले. देशातील बाजारात आवकेचा दबाव कायम असून भावही स्थिर दिसतात.

दरात केवळ २० ते ५० रुपयांच्या दरम्यान चढ उतार होत आहेत. तर दरपातळी ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बााजरातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana
Agrowon Podcast : नव्या तुरीची आवक वाढल्यानंतर भाव काय राहू शकतात?

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दबावातच आहेत. सरकारने थेट ग्राहकांना डाळ विक्री सुरु केल्याचा बाजारावरच दबाव दिसून येत आहे. हरभऱ्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून नरमलेला आहे. ऐन आवकेचा हंगामात २०२३ मध्ये दिसला होता त्या पातळीवर अनेक ठिकाणी भाव पोचला आहे.

सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव आहे. तर हमीभाव ५ हजार ४४० रुपयांपेक्षा हे भाव खूपच कमी आहेत. तर यंदा हरभरा लागवडही कमी झाली. पण सरकार बाजारावर दबाव ठेऊन आहे. त्यामुळे हरभरा बाजार उत्पादन किती होते यावर अवलंबून असेल, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

बाजारात सध्या वांगीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी झाली मात्र वांगीला उठाव चांगला आहे. त्यामुळे वांगी भाव तेजीत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने वांगी पिकाला फटका बसला होता.

तसेच कमी पाण्यामुळे लागवडीही कमी होत्या. याचा परिणाम आता बाजारातील आवकेवर होत आहे. सध्या वांग्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. वांग्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com