Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Market Update : देशातील बाजारात सध्या कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. वायदे आणि बाजार समित्यांमधील भाव टिकून राहताना दिसत नाहीत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon

Market Bulletin : देशातील बाजारात सध्या कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. वायदे आणि बाजार समित्यांमधील भाव टिकून राहताना दिसत नाहीत. तर बाजार सलग तिसऱ्या दिवशीही बंद असल्याने बाजारातील उलाढाल बंद होती. खेडा खरेदीत व्यवहार सुरु होते. पण भाव पाडून कापसाची मागणी केली जात होती.

पण मागील चार दिवसांमध्ये कापसाचा सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. उद्या बाजार सुरु झाल्यानंतर बाजारातील स्थिती स्पष्ट होईल. पण सरासरी भावपातळी टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातली अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात सोयाबीनमधील मंदी कायम आहे. सोयाबीनचे भाव काही प्रमाणात कमी जास्त होत असले तरी सरासरी भावपातळी वाढलेली नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंच्या भावात चढ उतार सुरुच आहेत.

तर देशातील बाजारात भावपातळी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवकही कायम आहे. ही परिस्थिती आणि काही आठवडे दिसू शकते, असाही अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीत वाढ

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्याने कांदा बाजारावरील दबाव कायम आहे. कांद्याचे भाव काही प्रमाणात नरमले देखील होते. तर बाजारातील कांदा आवक कायम दिसते.

सध्या देशातील बाजारात कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ११०० ते १४०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर सरकारचा दबाव आणि बाजारातील कांदा आवक कायम असेपर्यंत कांद्याचा याच पातळीदरम्यानच राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Soybean Market : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम

देशातील महत्वाच्या हळद उत्पादक राज्यात हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली. आतापर्यंत ७० टक्के हळद काढणी आटोपली. तर उरलेली ३० टक्के हळद येत्या पंधरा ते वीस दिवसांत पूर्ण होईल. पण यंदा हळद उत्पादनात ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. तसेच देशातील हळदीच्या उत्पादनाचे चित्र एप्रिलमध्ये स्पष्ट होईल.

सध्या देशातील बाजारात हळदीची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे हळदीला गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार १३ हजार ते २० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

किमान भाव ५०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी ८०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटोचे भाव कोसळल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com