Turmeric Market : हिंगोलीत नव्या हळदीची आवक सुरू ; १७५०० पर्यंत मिळतोय दर

Turmeric Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १८) हळदीची ३५०० क्विंटल आवक होती.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १८) हळदीची ३५०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १५००० ते कमाल १७५०० रुपये तर सरासरी १६२५० रुपये दर मिळाले.

संत नामदेव हळद मार्केटमध्ये आठवड्यातील सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी हळदीची आवक घेतली जाते. मागील आठवड्यापासून यंदाच्या हंगामातील नवीन हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे.

मागील आठवडयात सोमवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. १५) या कालावधीत हळदीची ६६५० क्विंटल आवक झाली. त्या वेळी हळदीला सरासरी १६७२५ ते १७३०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १५) हळदीची २८५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १५५०० ते कमाल १७६०० रुपये तर सरासरी १६५५० रुपये दर मिळाले.

Turmeric Market
Turmeric Market : वायद्यांमध्ये हळददराचा विक्रम ; कमी उत्पादनामुळे तेजी टिकून राहण्याचा अंदाज

बुधवारी (ता. १३) हळदीची २५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १६५०० ते कमाल १८१०० रुपये तर सरासरी १७३०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ११) १३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १५१०० ते कमाल १८३५० रुपये तर सरासरी १६७२५ रुपये दर मिळाले.

Turmeric Market
Turmeric Seed : शास्त्रोक्त पद्धतीने हळद बेणे साठवणूक

वसमतमध्ये १०८९० ते १७६९० रुपये

वसमत बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १६) हळदाची ५४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०८९० ते कमाल १७६९० रुपये तर सरासरी १४२९० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १५) ५७३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०६०० ते कमाल २०००० रुपये तर सरासरी १५३०० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. १२) १०७६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १२००० ते कमाल २१६०० रुपये तर सरासरी १६८०० रुपये दर मिळाले.

मागच्या बुधवारपासून नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. दररोज २५०० ते ३५०० क्विंटल आवक होत आहे. दरात चढ-उतार सुरू आहे. सध्या सरासरी दर १५ हजार रुपयांवर आहेत.
- नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com