Agrowon Podcast : हरभऱ्याचे भाव टिकून; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत मका दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, मका आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनचा भाव टिकून

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आजही काहीशी सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात मात्र सोयाबीनचा भाव कायम होता. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५५०  ते ४ हजार ६८० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस बाजारात नरमाई 

कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७०.७० सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होते. देशातही वायदे दबावातच आहेत. मात्र शुक्रवारी बाजार काहीसा सुधारून बंद झाला होता. जुलैचा वायदा शुक्रवारी ५६ हजार ७०० रुपयांपर्यंत होता. बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच टोमॅटो दर काय आहेत?

हरभऱ्याचा भाव कायम

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव काहीसे स्थिरावले आहेत. सरकारने हरभऱ्यावर स्टाॅक लिमिट लावल्यानंतर भावात काहीसे चढ उतार सुरु होते. पण मागणी टिकून असल्याने भाव पुन्हा टिकून आहेत. बाजारातील हरभरा आवकही सध्या मर्यादीत आहे. त्यामुळे हरभरा आजही सरासरी ६ हजार ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. देशात सध्या हरभऱ्याची उपलब्धता कमी असल्याने यापुढच्या काळातही हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Sugar Industry : साखर, इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याची ‘विस्मा’ची मागणी

आल्याच्या भावात चढ उतार

आल्याचे काहीसे टिकून असल्याचे दिसून येत आहे. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

मक्यातील तेजी कायम

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून तेजीत आहे. मक्याला देशात चांगला उठाव मिळतोय. पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योग आणि इथेनाॅल निर्मितीमध्येही मागणी चांगली आहे. यामुळे मका २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केद्रांवर मका २९९९ रुपयांनी विकला जात आहे. मक्याच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.       

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com