Sugar Industry : साखर, इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याची ‘विस्मा’ची मागणी

Ethanol Rate : उसाच्या एफआरपीत झालेली वाढ, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध व साखर निर्यात धोरण यामुळे साखर उद्योगाला प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उसाच्या एफआरपीत झालेली वाढ, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध व साखर निर्यात धोरण यामुळे साखर उद्योगाला प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

उसाच्या वाढीव एफआरपीशी साखर व इथेनॉलच्या किमती सारख्या करण्यासाठी एक सूत्र बनविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी साखरेसह इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याची मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केंद्र सरकारकडे केली आहे.

Sugar Export
Sugar Industry : साखर उद्योगाच्या मागण्या गांभीर्याने घ्या

केंद्र सरकारने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ३१ रुपये केली होती. ती आजतागायत स्थिर आहे. तथापि, उसाच्या एफआरपीत दरवर्षी लक्षणीय वाढ होत आहे. २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाची एफआरपी वाढवून तीन हजार ४०० रुपये प्रतिटन केली आहे.

सर्व घटक राज्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित सरासरी साखर किंमत ४१.६६ रुपये प्रतिकिलो आहे. प्रक्रिया केलेल्या इतर उत्पादनांच्या तुलनेत बाजारातील दर कमी असल्याने साखर कारखान्यांना प्रतिकिलो साखर विक्रीवर नगदी तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

Sugar Export
Sugar Export : साखर निर्यातीसाठी आक्रमक भूमिकेची जबाबदारी महाराष्ट्रावर

त्यामुळे इथेनॉल प्रकल्पांची उभारणी व विस्तारीकरणासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करणे अशक्य झाले आहे. येत्या साखर हंगामासाठी इथेनॉल संमिश्रण कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी कारखान्यांना आवश्यक इथेनॉल उत्पादन व वेळेत पुरवठ्यासाठीचे धोरण १५ ऑगस्टपर्यंत जाहीर होणे आवश्यक आहे, असेही ‘विस्मा’ने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीची, साखरेची विक्री किंमत व इथेनॉल उत्पादनाच्या किमतीशी सांगड घालणे आवश्यक आहे. साखर उद्योगास बूस्टर डोस मिळण्यासाठी साखरेची विक्री किंमत व इथेनॉलच्या किमतीत वाढ व्हायला हवी. कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन व साखर निर्यात धोरणास केंद्राने प्राधान्यक्रम द्यायला हवा.
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, ‘विस्मा’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com