Market Bulletin :
सोयाबीन स्थिरावले
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा वाढलेला भाव स्थिरावला आहे. सोयाबीन आजही दुपारपर्यंत १० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयातेलाचे वायदे ४१.९२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ३१३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही काही प्रमाणात सोयाबीन दरात सुधारणा झाली होती. सोयाबीनला बाजारात आजही ४ हजार ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी आज ४६०० ते ४७५० रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसामध्ये चढ उतार कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील वायदे बाजारात कापसाच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापासाचे वायदे शुक्रवारी ७० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान बंद झाले होते. देशातील वायदे आज दुपारपर्यंत ५८ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावापतळीही कायम दिसली. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटोचा भाव नरमला
टोमॅटोच्या भावात चढ उतार सुरु आहेत. टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांपासून पुन्हा काहीसा नरमला आहे. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसत आहे. वाढलेल्या पावसाचाही टोमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसत आहे. आजही टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये २ हजारांपेक्षा कमी दिसत आहे. तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
आल्याचे भाव टिकून
आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
हरभऱ्यातील तेजी कायम
हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे. पण मागणी कायम आहे. इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महीने आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.