Agrowon Podcast : बाजारातील तुरीची आवक आद्यपही कमी

Market Update : तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत.
Tur
TurAgrowom
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात शुक्रवारी सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे वायदे ११.८४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव ३४२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपये क्विंटलच्या दरम्यान आहेत.

तर बाजारातील आवक आजही कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे. याचा आधार देशातील बाजारालाही मिळण्याचा अंदाज आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. कापसाचे वायदे शुक्रवारी एकाच दिवसात ४ टक्क्यांनी कमी होऊन ९५.२८ सेंट प्रतिपाउंडवर आले होते. तर देशातील बाजारात कापसाचे भाव टिकून होते. कापसाला देशात प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

तर कापसाची आवकही कमीच आहे. यापुढच्या काळातही कापसाची आवक कमीच होत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील वाढही कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur
Tur, Chana Arrival : अमरावती बाजार समितीत तूर-हरभऱ्याची आवक वाढली

ज्वारीचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झालेले आहेत. रब्बीतील काढणी झाल्यानंतर बाजारातील ज्वारीची आवक वाढली आहे. रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्याने पुरवठा वाढलेला दिसतो. पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येत आहे.

त्यामुळे हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. सध्या ज्वारीला ३ हजार ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur
Tur Market Rate : मार्च महिन्यात तुरीचा भाव काय राहू शकतो? सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय करतंय?

देशातील बाजारात तुरीचे भाव टिकून आहेत. दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे. सरकार आयात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे. परिणामी तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत.

यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे. यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसत आहे. सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात  ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत.

त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com