Lemon Price: कळमना बाजारात लिंबाच्या दरात मोठी घसरण, आवक पोहोचली १०० क्विंटलपर्यंत

Lemon Market: कर्नाटकसह विविध भागांतून लिंबाची आवक वाढली असून, कळमना बाजारात लिंबाचे दर पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. मात्र, अमरावती बाजारात लिंबाचे दर ६००० ते ९००० रुपये क्विंटलच्या दरम्यान चांगले आहेत.
Lemons
LemonsAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: कर्नाटकसह देशाच्या विविध भागांतून आवक वाढल्याने कळमना बाजार समितीत लिंबाचे दर दहा हजार रुपये क्विंटलवरून थेट पाच ते सहा हजार रुपये क्विंटलवर आले आहेत. शनिवारी (ता. २९) बाजारात ७० क्विंटल लिंबाची आवक झाली.

कळमना बाजार समितीत आंबिया बहारातील लिंबाची आवक सुरू झाली असून, गेल्या पंधरवड्यात ती २५० क्‍विंटलवर पोहोचली. त्यानंतर आता १०० क्‍विंटल इतकी आवक रोज होत आहे. त्यातूनच लिंबाचे दर दबावात आले आहेत. विजापूर (कर्नाटक) भागात उत्पादित हे लिंबे असल्याचे सांगितले जाते आहे.

Lemons
Lemon Market : कर्नाटकी लिंबाच्या आवकेमुळे दर दबावात

लिंबाचे मृग, हस्त आणि आंबिया असे तीन बहर घेतले जातात. तापमानात वाढ होताच साधारणतः फेब्रुवारीत हस्त बहरातील लिंबाची आवक बाजारात होते. त्यामुळे दर स्थिर राहतात. यंदा मात्र मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने हस्त बहारातील फूल आणि फळधारणा झालीच नाही.

परिणामी, बाजारात आवक प्रभावित झाली. त्यातच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने लिंबाला मागणी देखील वाढली. याचा परिणाम दरावर होत त्याचे दर ८००० ते १०००० रुपये क्‍विंटलवर पोहोचले. हंगामातील हे सर्वांत उच्चांकी दर असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बाजारात लिंबाची आवक वाढती आहे. त्यातूनच मंगळवारी (ता.११) लिंबाची १३० क्‍विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली. त्याचा परिणाम दरावर होत ते ५००० ते ६००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

Lemons
Lemon Rate : उन्हाच्या तडाख्याने लिंबाच्या दरात उसळी

शनिवारी (ता.१५) पुन्हा आवक कमी झाल्याने लिंबाच्या दरात तेजी नोंदविली गेली. ८००० ते ९००० रुपयांवर दर पोहोचले. आता आवक १०० क्‍विंटलवर स्थिरावली असून, ५००० ते ६००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळत आहे.

शनिवारी ७० क्विंटल लिंबाची आवक होत याला ५५०० ते ६००० रुपये क्विंटलचा दर मिळाला. येत्या काही दिवसांतच विदर्भासह राज्याच्या विविध भागांतून देखील लिंबाची आवक होईल, असे सांगितले जाते. त्यामुळे दर आणखी दबावात येतील अशी भीती वर्तवली जात आहे.

अमरावती बाजारात दर उच्चांकी

कळमना बाजारात लिंबाच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी अमरावती बाजारात शनिवारी (ता. २९) २० क्‍विंटल इतकी आवक अत्यल्प होती. त्यामुळे या ठिकाणी दर तेजीत असून ६००० ते ९००० रुपये क्‍विंटलने लिंबाचे व्यवहार अमरावती बाजारात होत आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आबिया बहाराच्या लिंबाची आवक होईल. त्यानंतर दर आणखी दबावात येतील. सध्या विजापूरमधून (कर्नाटक) लिंबाची आवक होत असल्याने अनेक भागात लिंबाचे दर दबावात आले आहेत. आमच्या अमरावती बाजार समितीत आवक कमी असल्याने लिंबाचे दर सध्या तेजीत आहेत.
अंकुश झंझाट, लिंबू बागायतदार, माहूलीचोर, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com