Agriculture Commodity Market : तूर, मका, सोयाबीनच्या भावात वाढ

Tur Rate : तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,५२४ वर आली होती. या सप्ताहात ती ०.४ टक्क्याने वाढून रु. १०,५७१ वर आली आहे.
Soybean Maize
Soybean MaizeAgrowon

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ३ ते १० मे २०२४

१० मे २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात हळद, हरभरा व मूग वगळता सर्व वस्तूंचे भाव चढले. तुरीच्या किमती अजूनही रु. १०,००० च्या वर आहेत. मक्यात ३.८ टक्क्यांची वाढ झाली. सोयाबीनसुद्धा १.६ टक्क्याने वाढला.

किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने घसरून रु. ५७,३०० वर आले होते. या सप्ताहात ते ०.२ टक्क्याने वाढून रु. ५७,४२० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव ०.२ टक्क्याने वाढून रु. ५९,०६० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव रु. ६१,८०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७.६ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) सुद्धा या सप्ताहात ०.६ टक्क्याने वाढून रु. १,४५३ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

Soybean Maize
Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात ३.४ टक्क्यांनी वाढून रु. २,१२० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून) किमती ३.२ टक्क्यांनी वाढून रु. २,१३७ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,१४९ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.४ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १७,७५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.८ टक्क्याने घसरून रु. १७,४२९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. १८,६९८ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १९,१६० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ९.९ टक्क्यांनी जास्त आहेत.

Soybean Maize
Chana Import : हरभऱ्याचे भाव पाडण्यासाठी आयात शुल्क काढले; हरभरा भाव कसे राहतील? 

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. ६,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.८ टक्क्याने घसरून रु. ६,०५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,८२५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.६ टक्क्याने वाढून रु. ४,७७२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,५२४ वर आली होती. या सप्ताहात ती ०.४ टक्क्याने वाढून रु. १०,५७१ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे. मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,४८४ होती; या सप्ताहात ती रु. १,६३३ वर आली आहे. गेल्या तीन महिन्यांत कांद्याची आवक स्थिर आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ९१७ वर आली होती. या सप्ताहात रु. १,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com