Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Maize Productivity : देशात मका उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘मका वाढवा’ जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
Maize Production
Maize ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (जीईएमए) मका उत्पादन वाढविण्यासाठी सर्व पातळीवरून प्रयत्न सुरू केले आहेत. देशात मका उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘मका वाढवा’ जनजागृती मोहीम सुरू केली आहे. इथेनॉलसाठी मका उत्पादन वाढावे हा त्याचा मुख्‍य उद्देश आहे.

असोसिएशनने प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत असोसिएशनच्या सभासद कारखान्यांना ही माहिती विविध प्रसिद्घी माध्यमांतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विनंती केली जात आहे. यासाठी यू-ट्यूब, विविध सोशल प्लॅटफॉर्मची मदत घेण्यात येत आहे.

Maize Production
Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

असोसिएशनशी संबंधित असणारे मक्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पाचे कारखाने विविध मार्गाने शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. या मध्ये हे कारखाने बियाणे कंपन्यांशीही संपर्क साधतील. या कंपन्यांचे सहकार्य घेऊन शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचायचे याचे रणनीती आखली जाईल.

विविध कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क करून मका लागवडीला प्राधान्‍य दिले जाईल. कृषी शास्‍त्रज्ञ, खत कीटकनाशक कंपन्या, वाहतूक व्यवस्‍था करणारे घटक, व्यापारी, ग्राहक या सर्वांना एकत्र करून संबंधित प्रकल्पांनी मक्याचे उत्पादन वाढविण्‍यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी असोसिएशन प्रयत्न करीत आहे.

Maize Production
Maize Arrival : खानदेशात मक्याच्या आवकेत आणखी वाढ

येत्या काही दिवसांत खरिपाची तयारी सुरू होणार आहे. इतर पिकांबरोबर शेतकऱ्‍यांनी खरिपात मक्याची पेरणी करावी, यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. अन्‍य हंगामातही शेतकऱ्यांनी मक्याला प्राधान्य द्यावे, यासाठीचे प्रयत्न सुरूच राहतील. मका हे मुख्यत्वे करून पावसावर अवलंबून असलेले पीक आहे.

सध्‍या मक्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तसेच इथेनॉल प्रकल्पांनाही पुरेसा मका मिळून इथेनॉल चांगल्या प्रमाणात तयार होऊ शकेल, असे असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले.

‘उच्च उत्पादन देणाऱ्या वाण देण्याचे प्रयत्न’

‘‘एकूण अन्नधान्याच्या उत्पादनात मक्याचा वाटा केवळ दहा टक्के आहे. हे प्रमाण वाढवावे लागणार आहे. यासाठी मका संशोधन केंद्रांशी संपर्क साधून उच्च उत्पादन देणाऱ्या जाती शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध पातळीवर हे प्रयत्न केले जातील,’’ असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com