Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा

Soybean Bhav: देशात सोयाबीनवर दबाव असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली होती. सोयाबीनसोबतच सोयापेंडच्या दरातही वाढ झाली.
Soybean
SoybeanAgrowon
Published on: 
Updated on: 

Soybean Bazar : पुणेः देशात सोयाबीनवर दबाव असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली होती. सोयाबीनसोबतच सोयापेंडच्या दरातही वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातील सुधारणा कायम राहिल्यास देशातही दर सुधारू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

भारताचा सोयाबीन बाजार प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. आंतरराष्ट्रीय  बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ झाल्यानंतर देशातही सुधारणा दिसून येते. पण यंदा देशातील खाद्यतेल बाजारावर मोठा दबाव आहे. सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क निचांकी पातळीवर आणले आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात खाद्येतल आयात होऊन देशातील भाव पडले. परिणामी सोयातेलाकडून सोयाबीनला आधार मिळाला नाही. त्यातच ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाल्याने स्वस्त माल आंतरराष्ट्रीय बाजारात आला. यामुळे सोयापेंडचे भाव दबावात आले. याचाही फटका भारतीय सोयाबीन बाजाराला बसला.

Soybean
Soybean Market Rate: सोयाबीनच्या दरात आज, २८ मार्चला कोणत्या बाजारात सुधारणा झाली होती? कुठे झाली सर्वाधिक आवक?

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अमेरिकेतील सोयाबीन पिकाच्या स्थितीचा दरावर परिणाम दिसून येत आहे. मागील महिन्यातही अमेरिकते पावसाने ताण दिल्यामुळे दरात तेजीचा लाट दिसली होती. पण पाऊस पडल्यानंतर दरात पुन्हा नरमाई दिसून आली होती. पण मागील तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात पुन्हा सुधारणा दिसून आली.

सोयाबीनचे वायदे मागील २० दिवसांतील उच्चांकी दरावर पोचले आहेत. यापूर्वी ३० जून रोजी सोयाबीन वायद्यांनी १४.४० डाॅलरचा टप्पा गाठला होता. तर सोयाबीनच्या वायद्यांनी आज १४.१७ डालरचा टप्पा गाठला होता. सोयापेंडच्या वायद्यांनीही आज जवळपास एक महिन्यातील उच्चांकी टप्पा गाठला होता. वायदे आज ४१७ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. यापुर्वी २३ जून रोजी ४२२ डाॅलरचा टप्पा गाठला होता.

देशातील बाजारात मात्र सोयाबीनवरील दबाव कायम होता. सोयाबीनचे भाव मागील दोन महिन्यांपासून दबावात आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. बाजारातील सोयाबीन आवकही आज ६० हजार क्विंटलच्या दरम्यान होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशातील सोयाबीन लागवडीचा विचार करता, लागवड गेल्यावर्षीपेक्षा पिछाडीवरच दिसते. पुढील काळात सोयाबीन बाजार आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आणि देशातील पीक पेरणी तसेच पाऊसमान याच्यावर अवलंबून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com