
Sangli News: गतवर्षी अति पावसाचा फटका चिंचेलाही बसला आहे. त्यामुळे उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तासगाव बाजार समितीत चिंचेचे सौदे सुरू झाले आहेत. यंदाच्या हंगामात १०० ते २०० पोत्यांची (एक पोते ५० किलोचे) आवक होत असून, त्यास प्रति क्विंटल १० ते १२ हजार रुपये असा दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटलला एक ते दीड हजार रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे चिंच उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तासगाव बाजार समिती ही चिंचेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव बाजारपेठ आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातून चिंच तासगाव बाजार समितीत विक्रीला येते. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल असे चार महिने चिंचेचे सौदे असतात. गतवर्षी चिंचेला प्रति क्विंटल ८५०० ते ९५०० रुपये असा दर होता. गतवर्षी चिंचेला अपेक्षित दर मिळाले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
यंदाच्या हंगामात चिंचेची आवक सुरू झाली आहे. मुळात यंदा बाजार समितीत चिंचेची आवक उशिरा सुरू झाली आहे. तासगाव बाजार समितीत प्रत्येक सौद्याला १०० ते २०० पोत्यांची आवक होत आहे. सध्या चिंचेला प्रति क्विंटलला १० ते १२ हजार रुपये असा दर मिळत असून, हंगामाच्या प्रारंभापासूनच चांगले दर मिळत आहेत.
गतवर्षी कमी पावसाचा फटका चिंचेचा बसला होता. यंदा मात्र अतिवृष्टी झाली, याचा फटका चिंचेला बसला आहे. ऐन बहरात पाऊस झाल्याने चिंचेच्या झाडाला चिंच लागण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात चिंचेचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरात दीड हजारांपर्यंत वाढ
गतवर्षीच्या हंगामात चिंचेला ८५०० ते ९५०० प्रति क्विंटल असा दर होता. यंदा उत्पादन कमी असून, मागणीची चांगली असल्याने बाजारातून उठावही होत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटलला एक ते दीड हजार रुपयांनी दर अधिक मिळत आहे. चिंचेचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.