Tamarind Prices: शिरूर बाजारात चिंचेला मोठी मागणी; दर ११,००० रुपयांपर्यंत पोहोचले

Market Update: शिरूर बाजार समितीत चिंचेची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, दररोज १५० क्विंटलची विक्री सुरू आहे. गुणवत्तापूर्ण आणि आंबट चिंचेला बाजारात अधिक मागणी असून, टरफले काढलेली व फोडलेली चिंच चांगल्या दराने विकली जात आहे. पुण्यासह इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात चिंचेची मागणी वाढत आहे.
Tamarind
TamarindAgrowon
Published on
Updated on

Pune News : शिरूर येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सध्या चिंचेची आवक सुरू झाली आहे. दररोज सुमारे १५० क्विंटल चिंचेची आवक सुरू आहे. त्यासाठी किमान दर प्रति क्विंटल २५०० ते किमाल ३५०० रुपये, तर सरासरी ३३०० रुपये दर असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी दिली.

शिरूर व परिसरातील जिरायती पट्ट्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मोठ्या बांधावर चिंचेच्या झाडांची लागवड केलेली आहे. चिंचेपासून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. शिरूर बाजारात तालुका तसेच शेजारील पारनेर, श्रीगोंदा, दौड, आंबेगाव, बारामती, खेड तालुक्यांतूनही चिंचेची मोठी आवक सुरू आहे.

Tamarind
National Agricultural Market Policy: कृषी धोरणाच्या नावाखाली बाजार नियंत्रण कमकुवत करण्याचे धोरण!

बाजारात अखंड चिंच (न फोडलेली) प्रति क्विंटल २५०० ते ३५०० रुपये, टरफले काढलेली चिंच प्रति क्विंटल ३३०० ते ४५०० रुपये व फोडलेली चिंच प्रति क्विंटल ८००० ते ११००० रुपये, चिंचोका प्रति क्विंटल ३१०० ते ३२०० रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी चिंच विक्रीसाठी आणताना स्वच्छ करून, वाळवून व चांगल्या बारदाण्यात विक्रीसाठी आणावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

शिरूर परिसरातील चिंच चांगली व उत्तम दर्जाची असल्यामुळे गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आदी राज्यांमधून मोठी मागणी असल्याचे मे. मदनलाल गिरधारीलाल सुराणा फर्मचे आडतदार प्रकाश सुराणा यांनी सांगितले.

Tamarind
Tamarind Pest : चिंचेवर पहिल्यांदाच आढळून आला अळीचा प्रादुर्भाव

मार्केटमध्ये येणाऱ्या चिंचेची वैशिष्ट्ये

पिवळा रंग आणि गर अधिक असलेल्या चिंचेला चांगली मागणी.

आंबट चिंचेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद, दर चांगला मिळतो.

जेवढी पिवळी तेवढी ते जास्त आंबट असल्याने ग्राहक लगेच ओळखतो.

जुनी व काळसर रंगाची चिंच ही भेळ, पाणीपुरी, चाट यासाठी वापरतात.

काळसर रंगाची असलेली चिंच ही खाण्यास गोडसर असते.

गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये दोन ते तीन प्रकारच्या चिंचेची आवक होत आहे. सध्या चिंचेला चांगले दर मिळत आहे. पुणे व इतर जिल्ह्यातील हॉटेल, घरगुती भाज्या, सांबर, रसम, पाणी पुरी, भेळीतील चिंचपाणी बनविणारे विक्रेते, चिंच गोळी, जेली, चिंचोका पावडर यासाठी मोठी मागणी आहे. याशिवाय परराज्यातूनही चिंचेला चांगली मागणी आहे.
अरूण साकोरे, प्रशासक, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com