Women Impowerment : चिंचांमुळे मिळाला महिला मजुरांच्या हाताला काम ; एक किलो चिंच फोडणीला मिळतात १२ रुपये

Tamarind bursting : यंदा परिसरातील चिंचा चांगल्या फुटल्या. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला भाव मिळत असल्याने आडुळसह परिसरातील चिंचेचे व्यापारी येथील महिला मजुरांकडून मोठ्या प्रमाणात चिंचा फोडून घेत आहेत.
Tamarind bursting
Tamarind burstingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : आडुळ, जि. छत्रपती संभाजीनगर : यंदा परिसरातील चिंचा चांगल्या फुटल्या. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला भाव मिळत असल्याने आडुळसह परिसरातील चिंचेचे व्यापारी येथील महिला मजुरांकडून मोठ्या प्रमाणात चिंचा फोडून घेत आहेत. प्रति किलो चिंच फोडणीसाठी मजुरांना १२ रुपये मिळतात.

आडुळ, पिंप्रीराजा, बालानगर, पारुंडी येथील अनेक व्यापारी छत्रपती संभाजीनगर, बीडसह जालना जिल्ह्यातून चिंचाची खरेदी करून त्या फोडण्यासाठी येते आणतात. शेकडो क्विटंल चिंचा आडुळसह परिसरात फोडल्या जात आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कामाच्या प्रतिक्षेत असलेल्या महिला शेतमजुरांच्या हाता काम मिळाले आहे.

Tamarind bursting
MGNREGA : वीस हजारांहून अधिक मजुरांच्या हाताला काम

चिंचेच्या व्यापाऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात चिंचेच्या झाडावरील चिंचाची खरेदी करून त्या गावातील महिला मजुरांच्या हस्ते फोडण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्याने व्यापाऱ्यांना चिंचा फोडण्यासाठी आलेल्या महिलांना सावली व पिण्यासाठी जारच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.

सध्या चिंचेला चांगला भाव मिळत असल्याने भावात घसरण होण्याच्या अगोदर बाजारपेठेत विक्री व्हावी यासाठी चिंचेचे व्यापारी महिला मजुरांना जास्तीचे पैसे मोजून फोडणी करून घेत आहेत.महिला मजुरांना एक धडा (पाच किलो) चिंच फोडणीसाठी ६० रुपये मिळत आहे.

एक महिला दिवसांतून ५ ते ८ धडे चिंच फोडणी करते. त्यामुळे त्यांना ३०० ते ४५० रुपयापर्यंत रोजंदारी पडते आहे. माझ्याकडे १० ते १५ टन चिंच असून १५ ते २० महिला मजुरांमार्फत चिंचाची दररोज फोडणी केली जाते.

- हारूण पठाण, चिंचाचे व्यापारी, आडुळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com