नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात दर दिवसाला १६५० क्विंटलपर्यंत भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) झाली. घेवडा, लसणाच्या दरात (Garlic Rate) सुधारणा झाली. बटाट्याची आवकही (Potato Arrival) चांगली होती अशी माहिती बाजार समितीतून देण्यात आली.
नगर येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यात भाजीपाल्याची चांगली आवक झाली आहे. टोमॅटोची दर दिवसाला २१८ क्विंटलपर्यंत आवक होऊन ८०० ते १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. वांगीची ४० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते २५००, फ्लॉवरची ८३ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ४ हजार, कोबीची ९० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १६००, काकडीची ६३ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, गवारची ३९ पर्यत आवक होऊन १ ते ७ हजार, घोसाळ्याची १० क्विंटलपर्यंत १५०० ते ४ हजार, दोडक्याची २३ क्विंटलची आवक होऊन २५०० ते ४ हजार, कारल्याची २० क्विटंलपर्यत आवक होऊन १ हजार ते ४ हजार, भेंडीची ७० हजार क्विंटलची आवक होऊन ८०० ते २५००, वाल शेंगाची २८ क्विंटलची आवक होऊन २५०० ते ४ हजार, घेवड्याची ४१ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ७ हजार, बटाट्याची ३४५ क्विंटलची आवक होऊन १८०० ते २३००, लसणाची ५५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५ हजार ते ८ हजार रुपयांचा दर मिळाला.
तीनशे क्विंटल फळांची आवक
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दर दिवसाला ३०० ते ३२५ क्विंटल फळांची आवक झाली. मोसंबीची ९४ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ४ हजार ५००, संत्राची ३२ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ५ हजार, डाळिंबाची ७७ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते १५ हजार, पपईची १७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३ हजार, सीताफळाची १९ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ९ हजार, पेरूची १६ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ५ हजार, केळीची १४ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १७०० दर मिळाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.