Coimbatore Cotton Meeting: कापूस उत्पादक, बियाणे कंपन्या, उद्योजकांशी आज संवाद

Shivraj Singh Chouhan: कापूस उत्पादकता घटीचे प्रमुख कारण समोर करत आज (ता.११) कोइमतूर (तमिळनाडू) येथे कापूस बियाणे, उत्पादन व प्रक्रिया या क्षेत्रातील भागधारकांशी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद साधला जाणार आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कापूस उत्पादकता घटीचे प्रमुख कारण समोर करत आज (ता.११) कोइमतूर (तमिळनाडू) येथे कापूस बियाणे, उत्पादन व प्रक्रिया या क्षेत्रातील भागधारकांशी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद साधला जाणार आहे. या बैठकीनंतर सध्या सुरू असलेल्या ‘एचटीबीटी’चा मंजुरी वादाचा मार्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशभरातील शेतकरी, संशोधक, प्रक्रिया उद्योजकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन स्वत: केंद्रीय कृषिमंत्री श्री. चौहान यांनी ‘एक्स’वर व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. ते म्हणाले,‘‘मी स्वतः या बैठकीला उपस्थित आहे. या बैठकीत कापूस लागवडीशी संबंधित आव्हाने आणि शक्यतांवर चर्चा होईल, ज्यामध्ये शेतकरी संघटना, बियाणे कंपन्या, जिनिंग आणि सूत गिरण्या, कापड उद्योग आणि निर्यातदारांसह प्रमुख कापूस उत्पादक राज्ये सहभागी होतील.’’

Cotton
BT Cotton Fertilizer : बीटी कपाशी पिकासाठी खत व्यवस्थापन

दरम्यान, याबाबत बोलताना शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया म्हणाले, ‘‘बीटी कापसावरील वायरसमुळे त्याची उत्पादकता कमी झाल्याचा दावा करीत केंद्रीय कृषिमंत्री या क्षेत्रातील भागधारकांशी संवाद साधत नवा पर्याय कापूस उत्पादकांना देणार आहेत. मात्र ही सारी खेळी बियाणे कंपन्यांच्या दबावाखाली खेळण्यात आली असून, या माध्यमातून एचटीबीटीला परवानगी दिली जाणार आहे.’’

Cotton
Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड

श्री. जावंधिया यांनी या संदर्भाने केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांना पत्र लिहिले आहे. पत्रात ते म्हणतात, ‘बियाणे कंपन्यांच्या दबावात एचटीबीटी तंत्रज्ञानाला मान्यता दिली जाणार असेल तर मग हे तंत्रज्ञान देशभरात सरळ वाणांमध्ये उपलब्धतेची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांना ते स्वस्तात उपलब्ध होणे शक्‍य नाही. या संदर्भातील बारकावे आम्ही संबंधित बैठकीत मांडणार होतो, परंतु या बैठकीत सहभागाकरिता संधी देण्यात आली नाही.’’

‘टोल फ्री क्रमांकाची नौटंकी’

भागधारकांनी त्यांची मते नोंदविण्यासाठी १८००१८०१५५१ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर संपर्क केला असता आम्ही कोणतीच नोंद घेण्यास सक्षम नसून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत निरोप ही पाठविता येणार नाही, असे सांगण्यात आले. समोरील व्यक्‍ती हा मराठीत बोलत होता हा क्रमांक शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासाठी असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. त्यावरूनच ही नौटंकी असल्याचे सिद्ध होते, असा आरोप श्री. जावंधिया यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com