
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कपाशीची ७६.३७ टक्के क्षेत्रावरच आतापर्यंत लागवड झाली आहे. अजून लागवडीसाठी काही अवधी बाकी असला तरी सर्व साधारण क्षेत्र इतकी लागवड होण्याची शक्यता तूर्त दिसत नसल्याचे शेतकरी व जाणकारांचे म्हणणे आहे.
माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण १० लाख ३४ हजार ७४८ क्षेत्राच्या तुलनेत ७३.१२ टक्के म्हणजे ७ लाख ५६ हजार ६२७ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या पाच जिल्ह्यात सर्वसाधारण ४ लाख ४४ हजार ७८७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८३.९३ टक्के म्हणजे ३ लाख ७३ हजार ३१९.६० हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड हे जिल्हे प्रामुख्याने कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कपाशीच्या सर्वसाधारण ३ लाख ८८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्राच्या २ लाख ७० हजार ३२१ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६९.५७ टक्के क्षेत्रावरच कपाशी लागवड झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कपाशी ऐवजी मका तूर आधी पिकांना प्राधान्य दिले त्यामुळे कपाशीच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. वैजापूर तालुक्यात तर कपाशीच्या लागवड क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेतून निम्मी घट आल्याची स्थिती आहे. जालना जिल्ह्यात कपाशीच्या सर्व साधारण ३ लाख २२ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ६३ हजार २९७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सुमारे ८१.६९ टक्के क्षेत्रावरच कपाशी लागवड झाली आहे.
बीड जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख २३ हजार ८८९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख २३ हजार ९ हेक्टरवर म्हणजे ६८.८५ टक्के क्षेत्रावरच कपाशी लागवड झाली आहे. परभणी जिल्ह्यात कपाशीच्या सर्व साधारण १ लाख ९१ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ५ लाख ५५ हजार ७०५ हेक्टर म्हणजे सुमारे ८१.१२ टक्के क्षेत्रावरच कपाशी लागवड झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख १४६० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ७० हजार ६२४ हेक्टर वर म्हणजे सुमारे ८४.६९% क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. लातूर जिल्ह्यात कपाशीच्या सर्व साधारण ९३७६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १२५६७ हेक्टर म्हणजे सुमारे १३४ टक्के, धाराशिव जिल्ह्यात सर्व साधारण १०६३७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १५५ तर हिंगोली जिल्ह्यात सर्व साधारण ४०,३५७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३४,२६८ हेक्टर म्हणजे सुमारे ८४.९१ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.
ही आहेत कारणे
वेचनीवेळीं मजूर न मिळणे
कापसाच्या वेचणीचे वाढलेले दर
वाढलेला निविष्ठा व उत्पादन खर्च
उत्पादन खर्चाला परवडणारे दर न मिळणे
कापूस वेचणीचे तंत्र विकसित न होणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.