
Jalgaon News : खानदेशात जूनच्या सुरुवातीला व मे अखेरीस लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची वाढ बऱ्यापैकी आहे. पिकात तण अनेक भागात वाढले आहे. परंतु मजूरटंचाईमुळे अनेक शेतकरी तणनाशकांचा वापर करून तणनियंत्रण करून घेत आहेत.
पिकात दोनदा आंतरमशागत अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. आंतरमशागतीला पावसाची भीती असल्याने शेतकऱ्यांनी मध्यंतरी वेग दिला. तसेच रासायनिक खते देण्याचे कामही शेतकऱ्यांनी उरकले आहे.
एकदा रासायनिक खत देण्यात आले आहे. पीक आता ३० ते ३५ दिवसांचे झाले आहे. वाफसा नसल्याने मजुरांकरवी तणनियंत्रण शक्य होत नाही. यामुळे तणनाशकेही कापसात फवारली जात आहेत.
खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. पिकात हलक्या, अधिक पाणी वापराच्या जमिनीत तण वाढले होते. तणनियंत्रणासाठी मजूरटंचाई जळगाव, धुळे व नंदुरबारात आहे. यातच जळगाव जिल्ह्यात काही गावांत महिला, पुरुषांकरवी तणनियंत्रणाच्या कामासाठी २०० रुपये रोज, अशी मजुरी मागितली जात आहे.
शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांतील नुकसान, आणि वित्तीय संकटे यामुळे एवढी मजुरी देण्यास असमर्थता दाखविली. यामुळे काही गावांमध्ये शेतकरी व मजूर, असा संघर्षही होत आहेत. तणनियंत्रणाच्ंया कामासाठी २०० रुपये रोज, असा तोडगा काढण्यात आला आहे. पण कापसाचे क्षेत्र अधिक व मजूर कमी अशी स्थिती अनेक भागात कायम आहे.
यामुळे शेतकरी नाइलाजाने तणनाशकांचा उपयोगही करीत आहेत. एकरी १००० ते १२०० रुपये खर्च कापूस पिकात तणनियंत्रणासाठी लागत आहे. काही कंपन्यांनी परिणामकारक तणनाशके बाजारात आणली आहेत. तणनाशके परवडत असल्याने व चांगला लाभही तण नियंत्रणासाठी होत असल्याने शेतकरी त्यांचा उपयोग करीत आहेत.
युरियाची मागणी
खतांचा वापर यंदा सुरू होत असतानाच युरियाची टंचाई आहे. युरियाची कमी मात्रा किंवा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले. अधिक युरिया वापराने पिकात फुल व पातेगळ होत असल्याने काही शेतकऱ्यांनी युरियाचा अधिक वापरही टाळला आहे.
परंतु अन्य क्षेत्रांत युरियाची मागणी कायम आहे. अनेकांनी एकदा रासायनिक खतांचा डोस दिला आहे. आता पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर दुसरा बेसल डोस देण्याचे नियोजन केले जात आहे. पिकाची वाढ बऱ्यापैकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.