Soybean Productivity Issue: सोयाबीनच्या उत्पादकतेत घट हे चिंतेचे कारण: केंद्रीय कृषिमंत्री चौहान

Shivraj Singh Chouhan: उच्च प्रतीचे व सुधारित बियाणे, त्यासोबतच सोयाबीन शेतीचे यांत्रिकीकरणातून मात करता येईल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्‍त केले.
Agriculture Minister
Agriculture MinisterAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशसह देशाच्या विविध भागांत सोयाबीन उत्पादनात घट दिसून आली आहे. मजूर उपलब्धतेच्या अडचणीचा सामना देखील उत्पादक करीत आहेत. या अडचणींवर उच्च प्रतीचे व सुधारित बियाणे, त्यासोबतच सोयाबीन शेतीचे यांत्रिकीकरणातून मात करता येईल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्‍त केले.

Agriculture Minister
Soybean Farming: सोयाबीन उत्पादनवाढीसाठी इंदूरमध्ये मोठी बैठक; शेतकरी-शास्त्रज्ञ संवादावर भर

इंदूर (मध्य प्रदेश) येथील केंद्रीय सोयाबीन संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (ता. २६) ते बोलत होते. सोयाबीन संशोधन क्षेत्रातील भविष्याची दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने श्री. चौहान यांनी सोयाबीन उत्पादक चार राज्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी, कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची या वेळी उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Agriculture Minister
Shivraj Singh Chouhan : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची कॉँग्रेसवर टिका

श्री. चौहान म्हणाले, की सोयाबीनसह विविध पिकांची प्रति हेक्‍टर उत्पादकता कशी वाढेल यावर केंद्रित संशोधनावर यापुढे भर दिला जाणार आहे. सोयाबीन क्षेत्रातील उत्पादकतेसंबंधी अडचणी लवकरच दूर केल्या जातील. त्याकरिता सुधारित वाणांची उपलब्धता होईल. ‘जीनोम एडिटिंग’ तंत्रज्ञान आणि सुधारित लागवड तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच आज शेतीकामासाठी मजुरांच्या उपलब्धतेची मोठी अडचण आहे. शेतीव्यवस्थापनात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

सोयाबीन हे प्रोटीनचा (प्रथिने)महत्त्वाचा स्रोत आहे. सोया ढेपचा सुयोग्य वापर आणि मूल्यवर्धन करीत टोफू, सोया मिल्क असे उपपदार्थ सोयाबीन पासून मिळू शकतात. यातून सोयाबीन पिकापासून चांगला परतावा मिळणे शक्‍य होणार आहे. देशात गेल्या ११ वर्षांत खाद्यान्नाचे उत्पादन ४४ टक्‍क्‍यांनी वाढले आहे.
शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com