India-UK Trade Deal: भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

Free Trade Agreement: भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (एफटीए) गुरुवारी (ता. २४) शिक्कामोर्तब झाले. भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला याचा मोठा लाभ होणार असून, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापारी करार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
India-Britain Agreement
India-Britain AgreementAgrowon
Published on
Updated on

London News: भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (एफटीए) गुरुवारी (ता. २४) शिक्कामोर्तब झाले. भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला याचा मोठा लाभ होणार असून, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापारी करार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे कीर स्टार्मर यांच्या उपस्थितीमध्ये वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे भारतीय कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क हे पूर्णपणे हटविले जाईल. अन्य युरोपीय देशांना ब्रिटनमध्ये जेवढ्या सवलती मिळतात त्यापेक्षा अधिक सवलती भारतीय उत्पादनांना मिळतील.

India-Britain Agreement
US India Trade Deal: अमेरिकेसमवेत स्वतःच्या अटींवर करार करा

हळद, मिरी आणि इलायची यांसारखी कृषी उत्पादने आणि लोणची, डाळी आणि आंब्याचा पल्प यासारख्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क हे पूर्णपणे हटविण्यात आले आहे. भारतीय शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल, असे मानले जाते. भारताने देखील काही ब्रिटिश उत्पादनांवरील आयात शुल्क हे पूर्णपणे हटविले आहे. भारतीय कृषी क्षेत्रावर याचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दुग्ध उत्पादने, सफरचंद, ओट आणि खाद्यतेलांवर आयात शुल्क आकारले जाईल. भारतीय शेतकऱ्यांना फटका बसू नये म्हणून ही विशेष काळजी घेण्यात आली आहे. कोळंबी, सुरमई आणि माशांसाठी खाद्य म्हणून वापरले जाणारे पीठ यांच्या निर्यातीवर सध्या ४.२ टक्के ते ८.५ टक्के एवढे आयातशुल्क आकारण्यात येते. आता या आयात शुल्काचे प्रमाण शून्यावर येईल.

India-Britain Agreement
India US trade deal: अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका; एसबीआयच्या अहवालात इशारा

या करारामुळे ब्रिटनमध्ये वास्तव्य करणेही भारतीयांसाठी सुलभ होईल. भारतातील फ्रीलान्सरना तेथील ३६ सेवा क्षेत्रामध्ये प्रवेश मिळू शकेल. यासाठी तुमचे तिथे कार्यालय असणे बंधनकारक नसेल. यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तब्बल साठ हजार कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असे वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यातील बड्या लाभार्थी कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नोलॉजीस आणि विप्रो यांचा समावेश आहे.

दोन्ही देशांतील करारामुळे उद्योग करण्याची किंमत कमी होईल आणि उद्योगासाठीचा आत्मविश्‍वास त्यामुळे अधिक वृद्धिंगत होणार आहे. दोन मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थांमधील या करारामुळे वैश्‍विक स्थैर्याला बळकटी तर मिळेलच पण त्याचबरोबर समृद्धीही वाढेल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हा व्यापारी करार ऐतिहासिक असून यामुळे दोन्ही देशांतील वेतनमानामध्ये तर सुधारणा होईलच, पण त्याचबरोबर लोकांचे जीवनमान देखील सुधारेल. स्कॉटलंडमधील व्हिस्कीच्या उत्पादनालाही याचा लाभ होईल. ब्रिटिश नागरिकांना भारतीय कपडे, पादत्राणे आणि खाद्यपदार्थ हे कमी किमतीमध्ये उपलब्ध होतील.
कीर स्टार्मर, ब्रिटनचे पंतप्रधान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com