Jaggery Market: गूळ बाजारावर उन्‍हाचा परिणाम; मागणीबरोबर दरातही काहीशी घट

Jaggery Rate: बाजार समितीत गुळाचे दर क्‍विंटलला ४२०० ते ४५०० रुपये आहेत. गुळाची आवक रोडावल्याने येथील बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे होत आहेत.
Jaggery
JaggeryAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: गेल्‍या काही दिवसांपासून गुळाची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या गुजरातमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असल्याने व धार्मिक कार्यक्रमही रोडावल्याने त्याचा नकारात्मक परिणाम गुळाच्या मागणीवर झाला आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत दर व मागणीतही घट आली आहे. सध्या येथील बाजार समितीत गुळाचे दर क्‍विंटलला ४२०० ते ४५०० रुपये आहेत. गुळाची आवक रोडावल्याने येथील बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे होत आहेत.

सध्या उसाचा हंगाम पूर्णपणे संपला आहे. गुऱ्हाळघरांसाठी ऊस शोधण्यासाठी गुऱ्हाळघर चालक धावाधाव करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवड कमी असल्याने गुऱ्हाळासाठी ऊस मिळवणे अडचणीचे बनत आहे. पाडव्यानंतर गुळाची आवक मंदावली. दररोज सौदे काढण्याइतका गूळ येत नसल्याने एक दिवसाआड सौदे सुरू करण्यात आले आहेत.

Jaggery
Jaggery Restriction : गूळ निर्बंधांविरोधात उपाय शोधण्यासाठी विधी विभाग सक्रिय

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुऱ्हाळघरे अत्यल्प सुरू झाली होती. मुख्य हंगाम मार्चमध्ये संपला असला तरी गेल्या काही वर्षांपासून बाजार समितीत पावसाळा सुरू होईपर्यंत गुळाची आवक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आवक कमी असली तरी एक दिवसाआड तरी आवक होतच असते.

सध्या देशभरातच उष्णता वाढत आहे. गुळाची सर्वाधिक मागणी असणाऱ्या गुजरातमध्ये याचा परिणाम अधिक जाणवत आहे. तिथे सातत्याने ४० अंश सेल्सिअसवर तापमान असल्याने बाजारपेठांतील उलाढाल थंडावली आहे. गुजरातमध्ये फारसे धार्मिक कार्यक्रमही होत नसल्याने तेथील गुळाची मागणीही कमी आहे. वर्षभर गूळ मिळत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी गेल्या हंगामात गुळाची शीतगृहासाठी खरेदी केली नाही. यामुळे शीतगृहात गुळाचा साठा फारसा नाही. परिणामी सध्या येणाऱ्या गुळाची विक्री येईल त्या प्रमाणात होत आहे.

Jaggery
Jaggery Price: कोल्हापुरात गुळाला झळाळी! अंतिम टप्प्यात दर उच्चांकी

गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत गुळाच्या दरात १०० ते २०० रुपयांनी घट झाली आहे. बाजार समितीत एक दिवसाआड १५ ते २० गाड्या गुळाची आवक होत आहे. बहुतांश गूळ कोल्हापूर शहराच्या आसपासच्या भागांतून येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कर्नाटकातूनही गुळाची आवक गुजरातच्या बाजारपेठेत कमी जात आहे. कर्नाटकातील काही भागांत वर्षभर चालणारी गुऱ्हाळे आहेत.

पण या गुऱ्हाळांनाही ऊस मिळत नसल्याने जेवढी अपेक्षित गूळनिर्मिती त्यांच्याकडून होणे अपेक्षित होते तितकी होत नसल्याने अनेक गुऱ्हाळघरे सध्या उसाअभावी बंद असल्‍याचे चित्र आहे. यामुळे कोल्हापूर परिसरातील गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत मागणी कमी असली तरी मागणीत सातत्य असल्‍याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

कोल्‍हापूर बाजार समितीतील दर स्थिती

(दर रुपयांत, प्रति क्विंटल)

प्रत किमान कमाल सरासरी

१) ४४५० ४४५० ४४५०

२) ४३०० ४४०० ४३००

३) ४२०० ४२९० ४२५०

४) ४००० ४१९० ४१००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com