Banana Export: निर्यातीच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटल दर

Banana Market: खानदेशातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! रोज १५ कंटेनर केळी निर्यातीला जात असून, निर्यातीच्या केळीला जागेवर २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. यंदा पश्चिम बंगालच्या कुशल मजुरांची मदत आणि वाहतुकीच्या सुधारलेल्या व्यवस्थेमुळे निर्यातीला गती मिळाली आहे.
Banana
BananaAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी निर्यातीला मागील महिन्यात सुरुवात झाली आहे. सध्या रोज १५ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. निर्यातीच्या केळीला कमाल २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर जागेवर शेतकऱ्यांना मिळत आहे.

शेतातच निर्यातीसंबंधी स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग आदी कार्यवाही केली जात आहे. केळी निर्यातीच्या कार्यवाहीसाठी काही बड्या कंपन्या खानदेशात केळीची खरेदी करीत आहेत. या कंपन्यांनी पश्‍चिम बंगालमधील सुमारे साडेचार हजार मजूर केळी पॅकिंग, काढणीच्या कार्यवाहीसाठी उपलब्ध केले आहेत.

Banana
Tissue Culture Banana Sapling: केळीच्या टिश्‍युकल्चर रोपांनाही यंदा महागाईची झळ!

गेल्या वर्षी केळी निर्यातीला कुशल मजूर उपलब्ध होत नव्हते. तसेच वाहतुकीसंबंधी देखील अडचणी होत्या, निर्यात रखडत सुरू होती. यंदा खानदेशातून सुमारे दोन हजार कंटेनर मार्च ते जून या कालावधीत आखातात निर्यात होण्याची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात झाली असून, सध्या रोज १५ कंटेनर केळीची निर्यात होत आहे.

Banana
Banana Plantation : उष्णतेमुळे केळी लागवड रखडली; मे, जूनमध्ये लागवडीचे नियोजन

पुढे निर्यात वाढेल. यात तीन ते चार कंटेनर रोज शहादा तालुक्यातून एका कंपनीच्या मदतीने आखातात पाठविले जात आहेत. तर जळगाव जिल्ह्यातून रोज सहा ते सात कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे. सावदा (ता. रावेर), तांदलवाडी (ता. रावेर) येथील केळी पॅक हाउसची मदत केळी निर्यातदार कंपन्यांना केळी पॅकिंग व इतर कार्यवाहीसाठी होत आहे.

निर्यातीच्या केळीला कमाल २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. चोपडा, यावल, रावेरात अधिकची निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहेत. धुळ्यातील शिरपुरातही निर्यातक्षम केळी अधिक आहेत. सुमारे १२ केळी खरेदीदार कंपन्या खानदेशात केळी खरेदी करीत आहेत. यामुळे केळी दरांवरील दबाव दूर झाला आहे. सध्या आंध्र प्रदेशातही केळी उपलब्ध नाही. यामुळे दिल्ली, पंजाब, काश्मीर आदी भागांतूनही खानदेशातील केळीला उठाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com