
Nagpur News : दोन दिवसांत झालेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण होत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात पावसामुळे ४७३ वर घरांचे नुकसान झाले. ११ जनावरे ठार झाली असून, दोन व्यक्तींचा पाण्यात वाहून जात मृत्यू झाला आहे.
८ आणि ९ जुलैला नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. अवघ्या काही तासांमध्येच जिल्ह्यात दोनशे मिलि मीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील विविध गावे आणि शहरातील वस्त्यांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना एसडीआरएफ, एनडीआरएफच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
शेकडो वस्त्यांतील नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कुठे नागरिकांच्या घराचे भिंत पडणे, घर पडणे अशा पद्धतीचे नुकसान झाले.
या दोन दिवसांच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत शहरातील उप्पलवाडी आणि कळमेश्वर येथे दोन तरुणांचा नाल्याच्या पाण्यात वाहून जात त मृत्यू झाला.
तर हिंगणा, रामटेक, पारशिवणी, कुही तालुक्यात लहान-मोठ्या अकरा जनावरांचा मृत्यू झाला यासोबतच दोन जनावरे जखमी झाले. त्याचप्रमाणे नागपूर (ग्रामीण) सह मौदा, रामटेक, पारशिवणी आदी ठिकाणी जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. पावसामुळे जिल्ह्यात ८ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, या या नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सर्व्हेक्षणाला सुरुवात
पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्व्हेक्षणाला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. यात महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटीतून सर्व्हेक्षण करत आहे. सर्व्हेक्षणाअंती अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल.
व्यक्ती, जनावरे, घरांचे झालेले नुकसान
मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या - २
मृत जनावरांची संख्या -११
जखमी जनावरांची संख्या - २
शहरात घरांचे झालेले नुकसान २००
जिल्ह्यात घरांचे अंशतः झालेले नुकसान - ४६९
घरांचे पूर्णतः झालेले नुकसान -४
जनावरांच्या गोठ्यांचे झालेले नुकसान - ४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.