Turmeric MSP : हळदीला ९ हजार रुपयांचा हमीभाव; हिमाचल सरकारचा मोठा निर्णय

Himachal Turmeric Policy: हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत हिमाचल प्रदेश सरकारने हळदीसाठी प्रतिक्विंटल ९ हजार रुपये हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

Pune News: हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे हळद उत्पादनासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी सरकार हळदीला हमीभाव देण्याचा विचार करत आहे. हळदीची प्रतिक्विंटल ९ हजार रुपयाने सरकार खरेदी करेल. हळद हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सरकार सुरु करणार आहे, अशी माहीती हिमाचल प्रदेशचे कृषिमंत्री चंदर कुमार यांनी दिली.

जगात हळद उत्पादनात भारत आघाडीवर आहे. निर्यातही भारतातून जास्त होत असते. पण हमीभावाचा आधार नसल्याने हळदीच्या भावात मोठे चढ उतार दिसून येतात. भाव पडल्यानंतर सरकारची खरेदीही होत नाही. बाजार कमी झाल्यानंतर कापूस आणि सोयाबीनप्रमाणे हमीभावाचा आधारही नसतो. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना कमी भावात हळदीची विक्री करावी लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. शेतकरी काही वर्षांपासून अशी मागणी करत आहेत. 

Turmeric
Turmeric Price: हळदीचा बाजार स्थिरावला; कोबी, केळी आणि कापसाचे आजचे दर काय?

केंद्र सरकारने अजून हळदीला हमीभाव जाहीर केला नाही. पण हिमाचल प्रदेश सरकार राज्यात हळद उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हमीभाव देणार आहे. हिमाचल प्रदेशचे कृषिमंत्री चंदेर कुमार यांनी राज्याच्या कृषी विभागाला राज्यात हळद उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. तसेच राज्य सरकार हळद खरेदीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले. 

Turmeric
Risod Turmeric Hub: रिसोड बनले हळदीचे केंद्रबिंदू

तसेच हिमाचल प्रदेशातील उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या खरिपात कडधान्य, तेलबिया आणि भाजीपाला उत्पादन वाढविण्याचाही सरकारने निर्णय घेतल्याचे कुमार यांनी सांगितले. 

हळद उत्पादन वाढवा

हिमाचल प्रदेशात हळद उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कृषिमंत्री कुमार यांनी राज्याचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापिठाला यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून तसेच राज्यातील वातावरण आणि हवामानाला पोषक हळदीच्या वाणाचा प्रसार करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पिकाचा चांगला पर्याय मिळेल. सरकारही शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार देईल. सरकार ९ हजार रुपये प्रतिक्विंटलने हळद खरेदीची प्रक्रिया सुरु करेल. यामुळे भाव पडलेल्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असेही हिमाचल प्रदेशचे कृषिमंत्री चंदेर कुमार म्हणाले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com