Sitaphal Market : यंदाच्या हंगामात सीताफळाची चांगली आवक

Market Update : दुसरीकडे सीताफळ फळबागांमधूनही आता तोडणीला वेग येऊ लागला असून बाजारात फळाचा आकार व दर्जानुसार दर मिळत आहेत.
Sitaphal Market
Sitaphal MarketAgrowon
Published on
Updated on

Akola News : सततच्या पावसाचा सीताफळ बागांना एकीकडे फटका बसला तर हाच पाऊस डोंगरदऱ्यातील सीताफळाला फायदेशीर ठरला. यंदा डोंगरातील सीताफळाची चांगली आवक होत आहे. दुसरीकडे सीताफळ फळबागांमधूनही आता तोडणीला वेग येऊ लागला असून बाजारात फळाचा आकार व दर्जानुसार दर मिळत आहेत. सरासरी दर हा ४० ते ५० रुपयांदरम्यान प्रतिकिलो मिळतो आहे. यंदाच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून हंगाम समाधानकारक राहील, अशी अपेक्षा उत्पादक व्यक्त करीत आहेत.

महाराष्ट्रात सीताफळाने एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र व्यापले आहे. शिवाय डोंगरदऱ्यांमधील सीताफळाचेही मोठे क्षेत्र आहे. देशात महाराष्ट्र सीताफळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील काही वर्षांत सीताफळ प्रक्रिया उद्योगही स्थिरावत आहे. सीताफळ हे दुर्लक्षित फळपीक आहे. या पिकात संशोधनाबाबत अनेक उणिवा सांगितल्या जातात. कमी पाण्यात, कमी मशागत व संसाधनात हमखास उत्पन्न देणारे व दीर्घ आयुष्यमान असणारे सीताफळ हे पीक मागील काही वर्षांत कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरते आहे.

Sitaphal Market
Sitaphal Cluster : खेमजईने विकसित केले सीताफळ क्‍लस्टर
माझी दोन एकरांत बाग आहे. यंदा एका झाडावर ५० ते ६० फळे आहेत. मी, माझे वडील आणि भाऊ, असे तिघे मिळून अकोल्यात स्वतःच विक्री करीत आहोत. सुरुवातीला १२० रुपये किलोने विक्री केली. आता ८० ते १०० रुपयांदरम्यान विकतो आहे. थंडीचा जोर वाढल्यानंतर मागणी अधिक येते, हा मागील दोन-तीन वर्षांतील अनुभव आहे.
हरीष धोत्रे, सीताफळ उत्पादक तथा विक्रेते, विवरा, जि. अकोला
Sitaphal Market
Sitaphal Orchard Management : सीताफळ बागेचे नियोजन, व्यवस्थापन
यंदा फळांचा दर्जा चांगला आहे. सीताफळाच्या बालानगर वाणावर फळांची सेटिंग चांगली आहे. सीताफळाच्या गोल्डन वाणाला केवळ ३० टक्केच फळधारणा बागेत झाली आहे. पुढील काळात मार्केटिंग सुरू होणार आहे.
बाळकृष्ण पाटील, सीताफळ उत्पादक, कंडारी, जि. बुलडाणा
आमच्या भागात (जानेफळ, जि. बुलडाणा) तोडणी सुरू झाली. दोन गाड्या हैदराबादला, एक गाडी मुंबईला रवाना केली. अकोलासारख्या बाजारपेठेत हजार क्रेटपर्यंत आवक होत आहे. सततच्या पावसाने झाडांवर सेटिंग कमी झाली तरी फळांचा आकार तुलनेने चांगला आहे. बाजारपेठेत ३५ ते ९० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. प्रक्रियेसाठी मिळणारी दुय्यम फळे २० ते २५ रुपये किलोप्रमाणे विकत आहेत. दसऱ्यापासून प्रक्रिया उद्योग सुरू होतील, असे दिसते.
श्‍याम गट्टाणी, अध्यक्ष सीताफळ, महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com