Ginger Rate : आल्याला प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपये दर

Ginger Market Update : बाजारात आवक अधिक आणि मागणी अपेक्षित नसल्याच्या परिणामी आले (अद्रक) दर दबावात आले आहेत. आल्याला प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपयांचा दर मिळत आहे.
Ginger
GingerAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : बाजारात आवक अधिक आणि मागणी अपेक्षित नसल्याच्या परिणामी आले (अद्रक) दर दबावात आले आहेत. आल्याला प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपयांचा दर मिळत आहे. मार्च-एप्रिल महिन्यांत या दरात काहीशी सुधारणा होत ते पाच हजारांवर जातील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आले लागवड केली जात असून आल्याचे क्षेत्र तीन हजार हेक्टरपर्यंत आहे. तर १९१३ हेक्‍टर क्षेत्रावर हळद लागवड होते. त्यानंतर सांगली परिसरातही हळद लागवडीखालील १०० हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात देखील बाजारपेठेचा अंदाज घेत आले लागवडकर्ते शेतकरी आहेत.

Ginger
Ginger Rate : आले दरात घसरण सुरूच

त्यामध्ये बुलडाणा, वाशीम, अकोला हे जिल्हे आघाडीवर आहेत. २०२२-२३ या वर्षात आले दर उच्चांकी १४ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी २०२३-२४ मध्ये आले दरात काहीशी घसरण होत ११ हजार रुपयांवर दर आले. यावर्षी ३२०० ते ४२०० रुपयांवर आले दर स्थिरावले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील आले उत्पादक विठ्ठल धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात बेंगलोरमधील (कर्नाटक) आले आवक होत आहे. दिल्ली, राजस्थान या भागातही बंगलोरमधून आले पुरवठा होतो. त्या भागात यंदा चांगली उत्पादकता त्याबरोबरच गेल्या काही वर्षांत आले पिकाला मिळालेला चांगला दर यामुळे महाराष्ट्रातही आले पिकाखालील क्षेत्रात झालेली वाढ, अशी अनेक कारणे आले दर दबावात राहण्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

Ginger
Ginger Crop Disease : आले पिकातील ‘पानावरील ठिपका रोग’

अमरावती बाजारात १५० क्‍विंटल आवक

अमरावती बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी रोज सरासरी १५० क्‍विंटल इतकी आले आवक होत आहे. बुधवारी (ता. १) आले दर ३२०० ते ४२०० रुपयांवर स्थिरावले होते.

आले साठविल्यास होईल फायदा

मे-जून महिन्यात लागवड केलेली असल्यास सप्टेंबरपासून आले काढणीस येते. त्या वेळी बाजारात नवा, जुना माल अशी विभागणी होत दर दिले जातात. त्यामुळे बाजाराचा अंदाज घेत काही महिने आले जमिनीत ठेवल्यास वाढीव दराच्या माध्यमातून फायदा होतो, असे विठ्ठल धांडे सांगतात. जमिनीत राहिल्यास आले वर्षानुवर्षे खराब होत नाही.

मार्च, एप्रिलमध्ये बियाणेकामी आल्याला मागणी असते, त्याबरोबरच लग्न कार्यामुळेदेखील मागणीत वाढ होत असल्याने दरात तेजी असते. परंतु यंदा लागवड क्षेत्रात झालेली वाढ तसेच बंगलोरमधून होणारी आवक पाहता दर दबावात आहेत. मार्च, एप्रिलमध्ये ते पाच हजार रुपयांवर राहतील. त्यापेक्षा अधिक वाढ होणार नाही, अशी शक्‍यता आहे.
विठ्ठल धांडे, आले उत्पादक, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com