
Satara News : आले पिकाच्या दर घसरणीचे चक्र सुरूच आहे. मागील महिन्याच्या तुलनेत तब्बल दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. सध्या आले पिकास प्रति गाडी (५०० किलो) नऊ ते दहा हजार रुपये दर मिळत आहे. दरातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागले असून, दर घसरणीच्या भीतीने आले काढण्याकडे कल वाढला आहे.
जिल्ह्यात या हंगामात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याने मूळकुज, कंदकुजमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आले. एकूण लागवडीच्या ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर पिकावरील मूळकुज बाधित झाले होते. आले पीक टिकविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने खर्चात वाढ झाली. मात्र अनेक प्लॉट नियंत्रणात न आल्याने काढण्याकडे कल वाढला.
मात्र दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात आले पिकाच्या खरेदीत प्रतवारी करून प्रति गाडीस (५०० किलो) ४० हजार रुपये दर मिळत आहे. जून महिन्याच्या तुलनेत प्रति गाडी सात ते आठ हजारांनी दरात घट सुरू झाली. जुलै महिन्याच्या अखेरीस पाच ते आठ हजारांनी घट होऊन नवे-जुने एकत्रित आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) २५ ते २८ हजार रुपये, तर प्रतवारी केलेल्या ३७ ते ४० हजार रुपये दर मिळाला होता
सप्टेंबर महिन्यात प्रतवारी केलेल्या आल्यास प्रतिगाडी ३२ ते ३४ हजार रुपये तर नवीन आल्यास प्रतिगाडी नऊ ते ११ हजार रुपये दर मिळाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आल्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र पुन्हा नोंव्हेबर महिन्यात घसरण सुरू झाली. नोव्हेंबर महिन्यात आल्यास गाडीस १५ ते १६ हजार रुपये दर टिकून राहिले होते.
त्यानंतर सुरू झालेली घसरण अद्यापही सुरूच आहे. डिसेंबर महिन्यात आल्यास प्रति गाडी १२ ते साडेबारा हजार रुपये दर मिळत आहे. मागील एका महिन्याच्या तुलनेत आल्याच्या दरात दोन हजार रुपये घट झाली आहे. सध्या मिळत असलेला दर मागील तीन वर्षांतील नीचांकी दर आहे. सध्या आल्यास प्रतिगाडी नऊ ते दहा हजार रुपये मिळत आहे. दरातील घसरणीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
दरवर्षी दर चांगले राहिल्याने जिल्ह्यात ५०० हेक्टरने क्षेत्रात वाढ होऊन तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आल्याची लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या मे महिन्यापासून गाडीला ४८ ते ५० हजार असणारा अवघ्या आठ महिन्यात दर नऊ ते दहा हजार रुपयांवर आला आहे. यामुळे आले उत्पादक अडचणीत आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.