
फ्युचर्स किमतीः सप्ताह- ११ ते १७ जानेवारी २०२५
गेल्या दोन सप्ताहापासून कापूस, मका व सोयबीन यांची आवक कमी होऊ लागली आहे. तूर व उशिराचा खरीप कांदा यांची आवक वाढू लागली आहे. पुढील महिनाभर ती वाढती राहील. पुढील महिन्यात नवीन हरभऱ्याची आवक सुरू आहे.
या सप्ताहात मूग व तूर वगळता सर्वच पिकांच्या किमती उतरल्या. कांद्याच्या किमती घसरून आता रु. १,७४० वर आल्या आहेत. टोमॅटोच्या किमतीसुद्धा रु. १,००० वर आल्या आहेत.
कपाशी, मूग, सोयाबीन, कपाशी व तूर या सर्वांच्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. सोयाबीनमधील फरक अधिक आहे. हरभऱ्याच्या किमती घसरू लागल्या आहेत. शासनाने निदान तूर व हरभरा यांच्या खरेदीसाठी तयारी केली पाहिजे.
१७ जानेवारी २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ५३,८६० वर आले आहेत. मार्च फ्युचर्स भाव २.८ टक्क्यांनी घसरून रु. ५४,७९० वर आले आहेत. मे भाव रु. ५७,५०० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६.८ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक वाढती आहे.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १,४२८ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स ०.६ टक्क्यांनी घसरून रु. १,४४० वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,४९० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.४ टक्क्यांनी अधिक आहेत.
कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात १.५ टक्क्यांनी घसरून रु. २,४५० वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स किमती रु. २,४६७ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स रु. २,४८० वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.२ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात २.१ टक्क्यांनी घसरून रु. १३,८२५ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती ७.६ टक्क्यांनी घसरून रु. १४,०२४ वर आल्या आहेत. मे किमती रु. १४,०२० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.४ टक्क्यांनी अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,२६३ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,२०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे; अर्थात, मुगाचा हंगाम आता संपला आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.३ टक्के घसरून रु. ४,३०५ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ०.३ टक्के घसरून रु. ४,२९३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) १.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,३९५ वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ७,४५० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक वाढती आहे; हमीभावापेक्षा बाजारातील किंमत कमी आहे.
कांदा
कांद्याची किंमत (पिंपळगाव) या सप्ताहात घसरून रु. १,७४० वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. १,००० वर आली होती; या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.
(सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.