Soybean Procurement : शेतकऱ्यांना दिलासा; घुंगराळा शेतकरी उत्पादक कंपनीकडून सोयाबीन खरेदी सुरू

Soybean Market : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे सुंकेवार शेतकरी उत्पादक कंपनीकडून केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफ व पृथ्वाशक्ती एफपीओ या राज्य स्तरीय एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीनची एमएसपी दरानुसार शासकीय खरेदी सुरु आहे.
Soybean Procurement
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे सुंकेवार शेतकरी उत्पादक कंपनीकडून केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफ व पृथ्वाशक्ती एफपीओ या राज्य स्तरीय एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीनची एमएसपी दरानुसार शासकीय खरेदी सुरु आहे.

या कंपनीकडून आजपर्यंत वीस हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. येथील खरेदी केंद्रामुळे परिसरातील सोयाबीन उत्पादकांना सुविधा झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यात एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सीकडून सोयाबीनची शासकीय खरेदी सुरु आहे. ता. एक आक्टोबरपासून विक्रीपूर्व नोंदणी तर ता. १५ आक्टोबरपासून खरेदी प्रक्रियेला सुरवात झाली. नांदेड जिल्ह्यात यंदा पणन महासंघ, विदर्भ को-ऑपरेटीव्ह फेडरेशन व शेतकरी उत्पादक कंपनीच्या राज्यस्तरीय एजन्सीच्या खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यात सध्या तीस पेक्षा अधिक खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी होत आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे सुंकेवार शेतकरी उत्पादक कंपनीकडून केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफ व पृथ्वाशक्ती एफपीओ या राज्य स्तरीय एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीनची एमएसपी दरानुसार शासकीय खरेदी सुरु आहे.

Soybean Procurement
Soybean Procurement : आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीला गती

या कंपनीकडे नायगाव तालुक्यासह कंधार, लोहा, मुखेड, उमरी तालुक्यातील तीन हजार २०० शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी केली आहे. यातील एक हजार ७०० शेतकऱ्यांचे वीस हजार मेट्रीक टन सोयाबीन खरेदी झाले आहे. यातील एक हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ कोटी रुपये जमा झाले आहेत.

Soybean Procurement
Soybean Procurement : देशात आतापर्यंत १४ लाख टन सोयाबीन खरेदी

सोयाबीन खरेदीची मुदत ता. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत असल्यामुळे नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती संचालक अनिल सुंकेवार यांनी दिली. तर शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर येताना शासनाच्या नियमानुसार सोयाबीन स्वच्छ करून आणावे, असे संचालक पांडुरंग मेलफलवार यांनी सांगितले.

घुंगराळा येथे सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सोयीचे झाले. यामुळे वाहतूक खर्च व वेळा वाचला.
- धोंडीबा दत्ता वानखेडे, सावरखेड, ता. नायगाव, जि. नांदेड.
काही वेळा बारदाना तुडवड्यामुळे सर्वच शेतकऱ्यांची सोयाबीनची शासकीय खरेदी ३१ जानेवारीपर्यंत होणार नाही. यामुळे शासनाने सोयाबीन खरेदीची तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवावी.
- हणमंत माधवराव वानखेडे, सावरगाव, ता. नायगाव, जि. नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com