

Pune News : यंदा हवामान बदलाच्या चक्रव्यूहात अडकलेला आणि मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे देखील लांबलेला जिल्ह्यातील गावरान आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगामाच्या शेवटी विविध आंब्याची मागणी वाढल्याने दरातदेखील वाढ झाल्याची माहिती पुणे बाजार समितीमधील गावरान आंब्याचे प्रमुख अडतदार यशवंत कोंडे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आदी डोंगरी भागांतील आंब्याचा हंगाम मेअखेर सुरू होऊन साधारण १५ जूनअखेरीस संपतो.
मात्र यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच गारपीट, अवकाळी पाऊस, थंडीची कमतरता आदी विविध कारणांनी गावरान आंब्याचा हंगाम चक्रव्यूहात अडकला होता. गारपिटीमुळे आंब्याचे उत्पादन आणि दर्जावरदेखील परिणाम झाला होता. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंब्यांची अत्यल्प आवक झाल्यामुळे गावरान आंब्यांचा हंगाम यंदा जेमतेम राहिला
मुळशीतील बेलावडे, उरवडे, मांदेडे, खेचरे, माले, खडकवासला गावांत गावरान आंब्यांची पारंपरिक लागवड आहे. आंबा पिकविण्यासाठी कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही. कोकण हापूसच्या हंगामानंतर खवय्ये मुळशीतील गावरान आंब्यांच्या प्रतीक्षेत असतात.
दर वर्षी मे महिन्याच्या अखेरीस गावरान आंब्यांचा हंगाम सुरू होतो. जूनच्या मध्यावधीपर्यंत हंगाम असतो. मात्र यंदा मॉन्सूनच्या लांबलेल्या आगमनामुळे हंगामदेखील लांबला, जिल्ह्यात नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने आंबा हंगामदेखील अंतिम टप्प्यात आल्याचे कोंडे यांनी सांगितले.
...असे राहिले गावरान आंब्यांचे डझनाचे दर
गावरान आंबा- ३०० ते ३५० रुपये
पायरी- २०० ते ३०० रुपये
गोटी आंबा- ५० ते १०० रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.