Fish Production : मत्स्य उत्पादनात ३८ हजार ५११ टनांनी घट

Fisheries : मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी होणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायावर गंडांतर आले आहे.
Fish Business
Fish BusinessAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादन गतवर्षी कमी झाले आहे. २०२१-२२ मध्ये १ लाख १२ हजार २८ टन उत्पादन मिळाले असून तुलनेत गतवर्षी २०२२-२३ मध्ये ते ६२ हजार ७१७ टन मिळाले.म्हणजेच उत्पादनात सुमारे ३८ हजार ५११ टनांनी घट झाली.

मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी होणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायावर गंडांतर आले आहे. जिल्ह्यात मासेमारी उद्योग महत्त्वाचा मानला जात असला तरी गेल्यावर्षी मासेमारी उद्योगातील नौकांचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून अपेक्षित मासळीचा ‘रिपोर्ट’ मिळत नसल्याने मासेमारी नौका विकण्याकडे कल वाढला आहे.

Fish Business
Fishing Income : ‘लागावण’च्या वाट्यात तोटा

मासेमारीच्या हंगामात अनेक नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीचे दिवस वाया जात असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी नौका विकण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये २,९३६ मासेमारी नौका होत्या. त्यामध्ये २,२५२ यांत्रिकी नौका होत्या. या मासेमारी नौकांना त्या वर्षात १ लाख १२ हजार २८ टन मासे मिळाले होते. तर २२-२३ मध्ये २,५२० नौका राहिल्या.

या नौकांना केवळ ६२,७१७ टन मासे मिळाले. २०२१-२२ च्या तुलनेत गेल्या वर्षात मच्छीमार नौका ४१६ ने कमी झाल्या, तर मासळी मिळण्याचे प्रमाण ३८,५१८ टनांनी कमी झाले. रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रात गतवर्षी ६८,४२४ टन मासळी मिळाली, २०२१-२२ मध्ये याच सागरी क्षेत्रात ४२,३८६ टन मासे मिळाले होते.

Fish Business
Fish Farming : मत्स्यपालनाचे आधुनिक तंत्रज्ञान बायोफ्लॉक फिशिंग

दापोली तालुक्यात २०२१-२२ मध्ये १७,२९० टन मासळी मिळाली होती. गतवर्षी याच मोसमात १२,४३७ टन मासळी मिळाली. गुहागरात २,८२२ टन मासळी मिळाली होती. गेल्या वर्षी मात्र १,५४२ टन मासळी मिळाली.

राजापूर तालुक्यात १२,१७२ टन मासळी मिळाली होती. गेल्या वर्षी हे प्रमाण निम्म्याने घटून ५,८७८ टनांवर आले. मंडणगड तालुक्याच्या सागरी क्षेत्रात ५२० टन मासे मिळाले होते. ते प्रमाण गेल्यावर्षी ४७४ टनांवर आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com