Fishing Income : ‘लागावण’च्या वाट्यात तोटा

Decrease Income of Fisherman : हवामानातील बदल, बेकायदा मासेमारीचा फटका ‘लागावण’च्या उत्पन्नावर झालेला दिसून येत आहे. मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या व्यवसायात मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Fishing
FishingAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : हवामानातील बदल, बेकायदा मासेमारीचा फटका ‘लागावण’च्या उत्पन्नावर झालेला दिसून येत आहे. मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या व्यवसायात मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंतचे मासळीचे उत्पन्न घटत अवघे २५ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे मच्छीमारांचे उत्पन्न लाखावर आले आहे. परिणामी तुटपुंज्या उत्पन्नात कसे भागवायचे, असा प्रश्न मच्छीमारांसमोर उभा राहिला आहे.

उत्तन परिसरात एक ऑगस्टला मासेमारीला सुरू झाल्यानंतर ते डिसेंबर अखेरपर्यंत जो व्यवसाय होतो, त्याच आढावा घेण्यासाठी मच्छीमारांची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात आली होती. त्याला मच्छीमारांच्या भाषेत ‘लागावण’ असे म्हटले जाते. या बैठकीत चार महिन्यांत झालेल्या व्यवसायापासून मिळालेल्या फायद्याची वाटणी केली जाते.

Fishing
Fish Farming : तिलापिया मत्स्य्यशेतीने दिला अल्पभूधारकास आर्थिक आधार

उत्तनमधील मच्छीमारांची देखील अशी बैठक नुकतीच पार पडली. या वेळी झालेल्या हिशेबात गेल्यावर्षीच्या तुलनेत अवघे २५ टक्केच उत्पन्न मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मच्छीमारांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून कोकण किनारपट्टीवरील मासळी मिळण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटले आहे. त्याचा परिणाम मच्छीमारांच्या उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा, असा प्रश्‍न उत्तनमधील मच्छीमारांसमोर उभा आहे.

उत्तनमध्ये मासेमारी व्यवसायासाठी १८ ते २० मच्छीमारांचा एक गट तयार करतात. हा गट मासेमारी बोट खरेदी करून एकत्रितपणे व्यवसाय करतो. लागावण बैठकीत नफ्या-तोट्याचा हिशेब होतो. एखाद्या मच्छीमाराला गट बदलून दुसऱ्या गटात जायचे असेल तरी त्याचा याच बैठकीत निर्णय घेतला जातो.

Fishing
Mangoor Fish : उजनी जलाशयात प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालनावर निर्बंध

मच्छीमार बांधव हवालदिल

आता थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे मासळी खोल समुद्रात निघून जाते. त्यामुळे पुढील किमान दोन महिने मासेमारीचा व्यवसाय थंडच राहणार आहे. उन्हाळ्याची चाहुल लागल्यानंतर मार्च महिन्यातच समुद्रात मासळी मिळण्याची आता अपेक्षा आहे. मासेमारीच्या सुरुवातीच्या तेजीच्या हंगामातच अपेक्षित फायदा न झाल्याने मच्छीमार हवालदिल झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून हवामानात बदल होत आहे. समुद्रात अचानक वादळी वातावरण निर्माण होऊन सोसाट्याचे वारे वाहतात. त्यामुळे अनेक वेळा मासेमारी न करताच किनाऱ्यावर परतावे लागते, शिवाय समुद्रात पर्ससीन नौका, एलईडी दिव्यांच्या नौकांची बेकायदा मासेमारी सुरू असते. त्याचा मासेमारीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.
वेस्टर्न नारळ्या, स्थानिक मच्छीमार
नवीन मासेमारी नौका, जाळ्यासाठी मच्छीमार कर्ज घेतो. मात्र यंदा उत्पन्नात मोठी घट झाल्यामुळे कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न मच्छीमारांसमोर उभा आहे.
अजित गंडोली, मच्छीमार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com