Mangoor Fish : उजनी जलाशयात प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालनावर निर्बंध

Ujani Dam Fishing : उजनी जलाशयात लहान मासेमारी, मासळी करणे त्वरित थांबवावे, सदर मासेमारी कामी उपयोगात येणारी जाळी व इतर साहित्य त्वरित नष्ट करावेत.
Fishing
FishingAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी जलाशयात मासेमारी करणाऱ्या मत्स्यव्यवसायिकांना तसेच लहान मासळीच्या अनधिकृतपणे विनापरवाना मासेमारी करणाऱ्या संबंधित मच्छीमारांवर तसेच जलाशयाच्या सभोवताली उजनी संपादीत क्षेत्रात प्रतिबंधित मांगुर मत्स्यपालनावर संयुक्तपणे कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

पुण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आण‍ि स्थानिक मच्छीमार संघटना प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.

Fishing
Fisheries : मत्स्य व्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

त्यानंतर प्रशासनाने या सूचना दिल्या आहेत. उजनी धरण परिसरातील सर्व संबंधित मत्स्य व्यावसायिकांनी याची गंभीरपणे दखल घेऊन उजनी जलाशयात लहान मासेमारी, मासळी करणे त्वरित थांबवावे, सदर मासेमारी कामी उपयोगात येणारी जाळी व इतर साहित्य त्वरित नष्ट करावेत.

Fishing
Fishery business : हर्णे बंदरातील माशांची कोटींची उलाढाल थांबली

तसेच प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांनी त्यांच्या कडे उपलब्ध असणारा प्रतिबंधित मांगुर मासा त्वरित नष्ट करून उजनी संपादित क्षेत्रात असणारी शेततळी देखील नष्ट करण्यात यावीत, अन्यथा अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार उजनी संपादित क्षेत्रात आढळून आल्यास संबंधितावर विविध कलमाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गंभीरपणे नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मच्छीमारांना परवाना आवश्यक

तसेच ज्या स्थानिक मच्छीमारांनी जलसंपदा विभागाकडून अधिकृतपणे उजनी जलाशयात मासेमारी करण्याचा परवाना घेतलेला नाही, अशा सर्व स्थानिक मच्छिमारांनी नजीकच्या जलसंपदा विभागाच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ते शासकीय शुल्क भरून त्वरित परवाना प्राप्त करून घ्यावा.

अन्यथा विनापरवाना जलाशयात प्रवेश केला म्हणून देखील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com