Aslam Abdul Shanedivan
मासे हा प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे ६० टक्क्यांहून अधिक लोकांना मासे आवडतात
अनेकांना शेतीबरोबर मत्स्यशेतीसाठीही करावी असे वाटते. पण त्याची योग्य माहिती नसल्याने ती करता येत नाही. त्याबाबत हे थोडसं
मत्स्यशेतीसाठी आधुनिक आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान हे बायोफ्लॉक असून यातून चांगेल उत्पादन मिळवता येते
बायोफ्लॉक तंत्रज्ञानामध्ये केवळ पाण्याची बचत होत नाही तर माशांच्या खाद्याचीही बचत होते. त्यामुळे बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे.
बायोफ्लॉक तंत्रज्ञानात मत्स्यशेतीसाठी मासे पाळण्यासाठी कोणत्याही तलाव किंवा शेत तळ्याची गरज नाही. या तंत्रात मासे टाक्यांमध्ये पाळले जातात.
बायोफ्लॉक तंत्रज्ञानात मत्स्यशेतीसाठी पंगासिअस, तिलापिया, देसी मांगूर, सिंघी, कोई कार्प, पाबडा, कॉमन कार्प आणि गोल्ड फिश पाळता येतात
या तंत्रज्ञानाच्या मदतीने १० हजार लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये सहा महिने मत्स्यशेती केल्यानंतर ३-४ क्विंटल विक्रीयोग्य माशांचे उत्पादन होते.