Khandesh Fruit Market : खानदेशात केळी दरात घसरण सुरूच

Banana Price Decline, : खानदेशात केळी दरात घसरण सुरूच आहे. दर १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. सध्या कमाल दर १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस मिळत आहेत.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात केळी दरात घसरण सुरूच आहे. दर १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. सध्या कमाल दर १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस मिळत आहेत.

तर, किमान दर ७००, ९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मध्यम दर्जाच्या केळीस १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत घट झाली आहे. मध्यंतरी दरांमधील चढ-उतार व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, केळी दरांवर नियंत्रण याबाबाबत रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांत चर्चा झाली होती.

Banana Market
Banana Production : निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी करमाळ्यात पोषक वातावरण

काही दिवस दर वधारतात. लगेचच त्यात १०० ते २०० रुपयांची घट होते. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु या बैठकीनंतरही दरात घसरण सुरू आहे.

Banana Market
Khandeshi Banana : ‘खानदेशी केळी’चा निर्यातक्षम ब्रॅण्ड

बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत ११८१ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. या दरांवर जळगाव, धुळे व नंदुरबारात केळीची थेट किंवा शिवार खरेदीचा निर्णय खरेदीदार घेत आहेत. यामुळे बऱ्हाणपुरातील दरांवर नियंत्रणाची मागणी कायम आहे. खानदेशात केळीची आवक कमी होत आहे.

उत्तरेकडे उठाव कमी

सध्या प्रतिदिन ३५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. उशिराच्या मृग बाग केळीमधून सध्या केळीची काढणी सुरू आहे. केळीची आवक सध्या जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, नंदुरबारातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात सुरू आहे. दर्जेदार केळीची थेट खरेदी करून शेतात पॅकिंग केली जात आहे. ही केळी काश्मिर, पंजाब, दिल्ली येथे पाठविली जात आहे. केळीला उत्तरेकडे उठाव सध्या कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com