Soybean : सोयाबीनचा पीकविमा पेरणीक्षेत्रापेक्षा अधिक

पीकविमा भरताना शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले आहे. पेरणीक्षेत्रापेक्षा तब्बल सव्वा लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्राचा अधिक विमा भरण्यात आला.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

नांदेड : पीकविमा (Crop Insurance) भरताना शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी (Cotton) सोयाबीन पिकाला (Soybean Crop) प्राधान्य दिले आहे. पेरणीक्षेत्रापेक्षा तब्बल सव्वा लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्राचा (Soybean Crop Insurance) अधिक विमा भरण्यात आला. तर कपाशीचे लागवड (Cotton Cultivation) क्षेत्र एक लाख ८२ हजार हेक्टर असताना विमा मात्र २३ हजार हेक्टरचा भरला आहे. या सोबतच तूर व ज्वारीचा विमा भरण्याकडेही शेतकऱ्‍यांनी दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे.

Soybean
Soybean : सोयाबीनचा पेरा घटला; दर काय राहतील?

जिल्ह्यात पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत यंदा सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद व मूग या सहा पिकांचा समावेश करण्यात आला होता. एक ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सहा पिकांसाठी दहा लाख ५७ हजार ५०८ अर्जदार शेतकऱ्‍यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेत सहा पिकांसाठी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. यासाठी शेतकऱ्‍यांनी ६८ कोटींचा विमा हप्ता भरला.

Soybean
Soybean : अमेरिका, भारतातील सोयाबीन हंगामाची स्थिती काय?

दरम्यान, कृषी विभागाकडील नोंदींनुसार जिल्ह्यात खरिपात चार लाख ३६ हजार ८३७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. तर विमा भरताना मात्र सात लाख ५४ हजार ७४० अर्जदार शेतकऱ्‍यांनी तब्बल पाच लाख ५४ हजार ८४४ हेक्टरसाठी विमा भरला. यामुळे पेरणी क्षेत्रापेक्षा १ लाख २० हजार हेक्टरवर विमा अधिक भरला गेला. तर, कपाशीचे लागवड क्षेत्र एक लाख ८२ हजार २६९ हेक्टर असताना ५६ हजार ८८९ शेतकऱ्‍यांनी केवळ २३ हजार ७५१ हेक्टरचा विमा भरला. जिल्ह्यात तूर ६८ हजार ८२७ हेक्टर लागवड झाली. पीकविमा मात्र १४ हजार ७७५ हेक्टरचा भरला गेला आहे. तर खरीप ज्वारीची १८ हजार ८७३ हेक्टरवर पेरणी झाली. मात्र सात हजार ६७२ हेक्टरसाठीचा विमा भरला आहे.

पीकनिहाय पेरणी आणि विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टर)

पीक...पेरणी झालेले क्षेत्र....विमा भरलेले क्षेत्र....अर्जदार शेतकरी

सोयाबीन....४,३६,८२७...५,५४,८४४...७,५४,७४०

कपाशी....१,८२,२६९....२३,७५१....५६,८८९

तूर....६८,८२७....१४,७७५....४८,२३३

मूग....२३,७३६....२७,७४६....९७,३२२

उडीद....२२,३९७....२२,६३१....७६,९३४

ज्वारी....१८,८७३....७,६७२....२३,३९०

एकूण....७,५५,३७६....६,५१,४२२....१०,५७,५०८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com