Soybean : सोयाबीनचा पेरा घटला; दर काय राहतील?

मागील हंगामात सोयाबीननं चांगलाच भाव खाल्ला. शेतकऱ्यांनी बाजारात एकदाच माल न विकता टप्प्याटप्प्यानं विकला. त्यामुळं बाजारात आवकेचा दबाव आला नाही.
Soybean
Soybean Agrowon
Published on
Updated on

पुणेः देशात यंदा सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र ताज्या आकडेवारीनुसार सोयाबीनचा पेरा (Soybean Sowing) काहीसा घटला. तर तिकडं बाजारात सोयाबीन (Soybean Rate) सध्या दबावात आहे.

Soybean
Soybean : हळद, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

मागील हंगामात सोयाबीननं चांगलाच भाव खाल्ला. शेतकऱ्यांनी बाजारात एकदाच माल न विकता टप्प्याटप्प्यानं विकला. त्यामुळं बाजारात आवकेचा दबाव आला नाही. त्यातच २०२०-२१ च्या हंगामातील शिल्लक सोयाबीन साठा नगण्य होता. त्यामुळं मागील हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन उपलब्ध नव्हतं. परिणामी ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात आल्यानंतरही दर दबावात आले नाही. सुरुवातीपासून सोयाबीनचे व्यवहार ५ हजार रुपयाने झाले. त्यानंतर दर हळूहळू वाढत गेले. मे महिन्यात दरानं काही ठिकाणी ८ हजारांचाही टप्पा गाठला होता. शेतकऱ्यांचं सोयाबीन सरासरी ७ हजार रुपयांनी विकलं गेलं.

Soybean
Soybean : अमेरिकेत सोयाबीन दर स्थिरावले

मागील हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्यानं यंदा शेतकरी सोयाबीनचा पेरा वाढवतील, असा अंदाज होता. सोयाबीनची लागवड १० टक्क्यांपर्यंत वाढेल असं उद्योगांकडून सांगण्यात येत होतं. त्यातच जून महिन्यात पावसानं ओढ दिली. त्यामुळं काही पिकांची लागवड कमी होत गेली. याचा फायदा सोयाबीन पेरणीला होईल, असं वाटत होतं. सुरुवातीच्या काळात सोयाबीनचा पेरा काहीसा जास्त होता. मात्र ऑगस्ट महिन्यात सोयाबीन लागवड क्षेत्रात घट होत गेली.

ताज्या आकडेवारीनुसार देशातील सोयाबीन लागवड अर्ध्या टक्क्याने कमी झाली. २६ ऑगस्टपर्यंत देशात ११९ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. तर मागीलवर्षी याच काळात १२० लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचं पीक होतं. म्हणजेच देशातील लागवड क्षेत्र ७२ हजार हेक्टरनं कमी झालं. त्यातच पिकाला पाऊस आणि किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळं यंदा गेल्यावर्षीऐवढं उत्पादन होईल, असा सध्यातरी अंदाज आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

मागील वर्षात सोयाबीनला चांगला दर मिळाला. मात्र उद्योगांचं गाळप कमी झालं. त्यामुळं सध्या देशात ३५ लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन शिल्लक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तसचं १५ ऑगस्टपर्यंत चालू हंगामातील सोयाबीन पेरा गेल्यावर्षीपेक्षा अधिक होता. त्यामुळं सोयाबीन दरही दबावात आले. देशात सध्या सोयाबीनला ५ हजार ४०० ते ६ हजार रुपये दर मिळतोय. सोयाबीनचा हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच नव्या हंगामात सोयाबीनला किमान ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळेल. त्यामुळं शेतकऱ्यांनी ही दरपातळी लक्षात घेऊन सोयाबीन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com