Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

अमेरिकेतील कापूस उत्पादक पट्ट्यात भीषण दुष्काळाची स्थिती
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः जगातील महत्वाच्या कापूस उत्पादक (Cotton Producer Country) देशांमध्ये यंदा दुष्काळ (Drought In Cotton Producer Country) आणि पावसाचा पिकाला फटका (Crop Damage) बसतोय. इतर देशांसह अमेरिकेतील महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाचं दुष्काळामुळं नुकसान (American Cotton Crop Hit By Drought) वाढलंय. त्यामुळे अमेरिकेत यंदा कापूस उत्पादनात (Cotton Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची टंचाई निर्माण होऊन दरही सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

बदलत्या वातावरणाचा अनेकद देशांमधील कापूस पिकाला फटका बसतोय. मागील काही वर्षांपासून ही स्थिती काही देशांमध्ये निर्माण होत होती. मात्र यंदा महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये कापूस पिकाचे पाऊस, दुष्काळ आणि कीड-रोगामुळे नुकसान होत आहे. यंदा जागतील तब्बल १३५ देशांना दुष्काळाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसत आहे. तर शेती उत्पादनात महत्वाच्या असलेल्या ३३ देशांमध्ये यंदा दुष्काळी स्थिती आहे. या देशांमध्ये कापूस उत्पादक अमेरिकेचाही समावेश आहे.

Cotton Rate
Tur Production : देशातील तूर उत्पादन घटणार?

जगात कापूस उत्पादनात भारत अग्रेसर आहे. मात्र यंदा भारतात पाऊस आणि कीड-रोगाचा फटका पिकाला बसतोय. परिणामी यंदाही उत्पादन कमी राहून भारतावर कापूस आयात करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज जागितक पातळीवरील काही संस्था व्यक्त करत आहेत. तर चीनमध्ये अतिउष्णतेमुळे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं चीनची भीस्तही आयातीवर असेल. तर ब्राझीलमधील उत्पादनावरही अतिउष्णता आणि कमी पावसाचा परिणाम झाला. त्यामुळं ब्राझीलमधील कापूस उत्पादन ३० टक्क्यांनी घटलंय.

Cotton Rate
Cotton Production: देशातील कापूस उत्पादन १२ टक्क्यांनी वाढणार

जगातील आघाडीच्या कापूस निर्यातदार अमेरिकेतही दुष्काळामुळं कापूस उत्पादन घटलंय. अमेरिकेतील महत्वाच्या कापूस उत्पादक टेक्सास राज्यात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. या राज्यातील ९५ टक्के भाग दुष्काळी आहे. त्यामुळे यंदा टेक्सासमधील शेतकरी आणि कापूस उद्योगाला किमान २०० काटी डाॅलरचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतेय. टेक्सासमध्ये अनेक भागांतील कापूस पीक हातचे गेले. तर ज्या भागात पीक आहे तेथे उत्पादकता घटली. लब्बॉक भागात टेक्सास राज्यातील ६६ टक्के कापूस उत्पादन होते. तर अमेरिकेतील एकूण उत्पादनापैकी जवळपास ३५ टक्के आणि जगाच्या ४ टक्के उत्पादन होते. मात्र या भागात यंदा कापूस पिकाची स्थिती दयनिय आहे. येथे निम्मे पिकही हाती येईल की नाही याबाबत शंका आहे.

टेक्सास राज्यात केवळ कापूसच नाही तर इतर पिकांचंही नुकसान होत आहे. उष्णता आणि पाण्याअभावी पिके जळत आहेत. धान्य उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. टेक्सासमध्ये परिस्थिती चांगली असल्यास जवळपास ५०० कोटींची उलाढल होते. मात्र यंदा ही उलाढाल ३०० कोटींपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. टेक्सासमधील कापूस उत्पादन यंदा निम्यावर येण्याची शक्यता असल्याने येथील जिनिंग कंपन्यांही अडचणीत आल्या आहेत. हा अमेरिकेतील कापूस उद्द्योगाला मोठा फटका आहे.

अमेरिकेत कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने अमेरिकेची निर्यातही कमी राहील. ब्राझीलचंही कापूस उत्पादन घटलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस टंचाई निर्माण होऊ शकते. भारतातही यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत राहू शकतात. तर देशातही कापसाला ९ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. त्यामुळं शेतकऱ्यांनी ही भावपातळी लक्षात ठेऊन बाजाराचा अंदाज घेऊन कापूस विक्री फायदेशीर ठरेल, असंही जाणकारांनी सांगितलं.

अमेरिकेतील स्थिती

- कापूस पीक निम्म्यावर येण्याची शक्यता

- निम्या जिनिंग अडचणीत येण्याची शक्यता

- शेतकऱ्यांना २०० कोटी डॉलर फटका

- मका आणि सोयाबीनलाही फटका बसण्याचा अंदाज

- चारापिकांना पाण्याअभावी नुकसान

- पशुपालक पाणी आणि चाऱ्याअभावी संकटात

- शेतकऱ्यांवर गाई विकण्याची वेळ

- दूध, धान्य आणि मांस उत्पादनही घटणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com