Tur Production : देशातील तूर उत्पादन घटणार?

देशातील तूर लागवड (Tur Cultivation) अद्यापही १३ टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लागवडही कमीच आहे. त्यातच पावसाचा पिकाला फटक बसत आहे.
Tur Import
Tur ImportAgrowon

भारतातून तीन महिन्यात १८ लाख टन गहू निर्यात

देशात गव्हाचे दर वाढल्यानंतर केंद्रानं १३ मे रोजी गहू निर्यातबंदी केली. मात्र त्यानंतर भारताच्या या निर्णयावर जगभरातून टिका झाली होती. आपण अन्नसुरक्षा धोक्यात असलेल्या देशांच्या सरकारांना गहू देऊ, अस भारतानं त्यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार भारतानं मागील तीन महिन्यांत १८ लाख टन गहू पुरवठा केलाय. त्यात अफगाणिस्तान, म्यानमार, सुदान आणि येमेन या देशांचा समावेश आहे. सरकार विविध देशांना गहू निर्यात करतंय. पण देशातील गव्हाचा साठा आता व्यापारी आणि कंपन्यांकडं गेलाय. त्यामुळं देशात गव्हाचे दर वाढत आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.

Tur Import
Sugarcane : यंदाही मराठवाड्याचा ऊस हंगामच सर्वाधिक चालणार

उसाचा पुढील गाळप हंगामही विक्रमी ठरणार

यंदाच्या गाळप हंगामासाठी १४ लाख ८८ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध असेल, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. लागवड झालेला सर्व ऊस साखर कारखान्यांना उपलब्ध होत नाही. जनावरांसाठी चारा, गूळ उद्योग आणि रसवंतीसाठी ५ ते ७ टक्के ऊस वापरला जातो. त्यामुळं कारखान्यांना अंदाजे १३ लाख ४३ हजार टन ऊस मिळण्याची शक्यता आहे. आगामी गाळप हंगामासाठी राज्याचा साखर उतारा ११.२० टक्के गृहीत धरण्यात आलाय. म्हणजेच एकूण १५० लाख टन साखर तयार होईल. तर किमान १२ लाख टन साखर यंदा इथेनॉलकडे वळविली जाईल, असं आयुक्तालयाचं म्हणणं आहे.

Tur Import
Maize : मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा विळखा

लष्करी अळीमुळं चीनचं मका उत्पादन घटणार

चीनमध्ये २०१९ मध्ये लष्करी अळीने प्रवेश केला. मात्र यंदा लष्करी अळीचा प्रादुर्भाव धोकादायक पातळीवर पोचलाय, असं चीनच्या कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलंय. मका पिकावर सध्या लष्करी अळीचं थैमान सुरु आहे. चीनच्या युनान, हुनान, हुई, सिचुआन, गुइझोऊ, हेनान, शानक्सी आणि इतर सात प्रांतांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. लष्कळी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं यंदा चीनचं मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. कारण या भागांतच मका लागवड अधिक असते. उत्पादन कमी राहिल्यास चीन आयात करेल. यामुळं मक्याच्या आंतरराष्ट्रीय बाजाराला आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Tur Import
Dairy Sector: डेअरी क्षेत्रामुळे ग्रामीण अर्थकारणास चालना: नरेंद्र मोदी

जगात दूध उत्पादनात भारत अव्वल

भारतात १९५०-५१ या वर्षात दूध उत्पादन केवळ १७ दशलक्ष टन होतं. त्यानंतर देशातील दूध उत्पादनात वाढ होत गेली. सध्या जागतिक पातळीवर भारत दूध उत्पादनात अव्वल ठरलाय. २०२१ मध्ये भारतात दुधाचं उत्पादन २०९.९६ दशलक्ष टन उत्पादन होतं. मागील वर्षात जगातील एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा २३ टक्के होता, असं केद्र सरकारनं सांगितलं. देशात दूध उत्पादन वाढलं तरी उत्पादकांना मिळणाऱ्या दराचा प्रश्न आजही कायम आहे. दुधाचा विक्री दर आणि उत्पादकांना मिळणारा दर, यात मोठी तफावत आहे. त्यामुळं दूध उत्पादकांची आर्थिक स्थिती बिकट होत आहे.

देशातील तूर उत्पादन घटणार?

खरिपातील एकूण कडधान्य लागवडीपैकी (Pulses Cultivation) सरासरी ३५ टक्क्यांपर्यंत क्षेत्र तुरीखाली (Area Under Tur) असते. देशात २९ जुलैपर्यंत एकूण कडधान्य लागवड गेल्यावर्षीपेक्षा २.८६ टक्क्यांनी अधिक झाली. पण यंदा तुरीची लागवड (Tur Sowing) घटली. मागीलवर्षी २९ जुलैपर्यंत देशात जवळपास ४२ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. मात्र यंदा केवळ ३६ लाख हेक्टरवर तुरीचा पेरा झाला. यंदा कापूस, भरडधान्य आणि तेलबिया पिकांना (Oil Seed Crop) शेतकऱ्यांनी पसंती दिली. कारण मागील हंगामात कापूस आणि सोयाबीनसह तेलबिया पिकांचे दर तेजीत होते. मात्र तुरीसह इतर कडधान्याच्या दराला हमीभावही गाठता आला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी तुरीला कमी पसंती दिली.

देशात आत्तापर्यंत १३.५१ टक्क्यांनी तुरीखालील क्षेत्र घटलंय. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश ही महत्वाची तूर उत्पादक राज्ये आहेत. या सर्वच राज्यांमध्ये तूर लागवड घटली. तेलंगणामध्ये सर्वाधिक ४५ टक्क्यांनी तुरीचं क्षेत्र घटलं. तर देशातील आघाडीवरील तूर उत्पादक कर्नाटकमध्ये जवळपास १० टक्क्यांनी तूर लागवड कमी झाली. महाराष्ट्रातही तुरीखालील क्षेत्र ११ टक्क्यांनी कमी झालंय. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनला पसंती दिल्याचं जाणकारांनी सांगितलं. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ११.१२ लाख हेक्टरवर तूर लागवड झाली, तर मागीलवर्षी याच काळातील लागवड १२.५१ लाख हेक्टरवर होती. देशात तूर लागवड तर घटलीच शिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाचा फटकाही पिकाला बसतोय. त्यामुळं यंदा तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com