Cotton Harvesting : पाऊस थांबला, कापूस वेचणीला वेग

खानदेशात मागील दोन दिवस पाऊस नाही. मध्येच ऊनही पडत आहे. वाराही येत आहे. यामुळे दोन दिवस कापूस वेचणीला वेग आल्याचे दिसत आहे.
Cotton Harvesting
Cotton HarvestingAgrowon

जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवस पाऊस नाही. मध्येच ऊनही पडत आहे. वाराही येत आहे. यामुळे दोन दिवस कापूस वेचणीला (Cotton Harvesting) वेग आल्याचे दिसत आहे. कापूस उत्पादक (Cotton Producer) व इतरांना कोरड्या वातावरणाची अपेक्षा आहे.

पाऊस थांबल्याने शेतीकामांनी वेग घेतला आहे. उडदाची तोडणी सुरू आहे. कापणी करून तो शेतात गोळा करण्याऐवजी थेट शेंगा तोडून त्या घरी आणण्याची कार्यवाही शेतकरी करीत आहेत. कारण कापणी करून शेतात उडीद काढणीसाठी ठेवावा लागेल. त्याचा ढीग करावा लागतो. यादरम्यान पाऊस आल्यास मोठी हानी होईल.

आता पावसाने उसंत घेतली आहे. याचा लाभ घेऊन शेतकरी उडीदाच्या शेंगा तोडून त्या थेट घरी आणत आहेत. सोयाबीनही पक्व होत आहे. त्याची कापणी, मळणी लवकरच सुरू होईल. यामुळे कोरड्या वातावरणाची गरज आहे.

Cotton Harvesting
Cotton Rate : पांढऱ्या सोन्याची झळाळी यंदाही कायम राहणार

सततच्या किंवा १३ दिवसाच्या पावसात अनेक प्रकल्प भरले. जलसाठे मुबलक झाले. परंतु पूर्वहंगामी कापसाचे नुकसान झाले. बोंडे खराब झाली आहेत. त्यात आर्द्रता आहे. त्याचा दर्जा खालावला आहे. परंतु नुकसान टाळण्यासाठी ही बोंडेही काढून ती घरी आणून हवेत किंवा पंख्याखाली वाळविली जात आहेत. शेतीकामे मागील दोन दिवस वेगात सुरू आहेत. पुढे कोरडे वातावरण राहिल्यास कामांना गती येईल.

Cotton Harvesting
Cotton Pest : गुलाबी बोंड अळी, रसशोषक किडींचे व्यवस्थापन

कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती बरी आहे. त्यात शेतकरी फवारणीसह आंतरमशागत, तणनियंत्रणाचे काम करीत आहेत. तसेच तणनाशकेदेखील फवारून घेत आहेत. कारण मजूरटंचाई जाणवत आहे. मजूरटंचाई लक्षात घेता शेतकरी तणनाशकांची फवारणी करीत आहेत. केळीची काढणीदेखील अनेकांनी दोन दिवसात अधिकाधिक करून घेतली आहे.

कारण पावसामुळे काढणीदेखील रखडली होती. शेतांत चिखल व पाणी असल्याने केळी घडांची शेतातून वाहतूक अडचणीची ठरत होती. तसेच वाहनेदेखील चिखलात रुतण्याची भीती होती. परंतु पाऊस थांबल्याने केळी काढणीदेखील अनेकांनी करून घेतली आहे. काळ्या कसदार जमिनीच्या भागात शेतरस्ते खराब झाले आहेत.

या रस्त्यांची स्थितीदेखील कोरड्या वातावरणाने सुधारेल. ज्वारी, मका पिकात दाणे पक्व होत आहेत. मका व ज्वारीला पावसाची फारशी गरज पुढे नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com