Cotton Rate : पाकिस्तानवर यंदा कापूस संकट

पाकिस्तानच्या कापूस पिकाला यंदा जोरदार पाऊस आणि पुराचा फार मोठा तडाखा बसला. त्यामुळे पाकिस्तानमधील बाजारातील कापूस आवक सध्या घटलेली दिसते.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

पुणेः पाकिस्तानच्या कापूस पिकाला (Pakistan Cotton Crop) यंदा जोरदार पाऊस आणि पुराचा फार मोठा तडाखा (Cotton Crop Damage) बसला. त्यामुळे पाकिस्तानमधील बाजारातील कापूस आवक (Cotton Arrival) सध्या घटलेली दिसते. पाकिस्तानच्या बाजारात चालू वर्षात ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ या तीन महिन्यांमधील कापूस आवक जवळपास ४१ टक्क्यांनी कमी झाली. केवळ ऑक्टोबर महिन्याचा विचरा करता आवकेत तब्बल ६७ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे यंदा पाकिस्तानच्या कापड उद्योगाला कापसाची फार मोठी टंचाई जाणवू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Cotton
Cotton Rate : कापसाला देशभरात किती दर मिळाला?

पाकिस्तान काॅटन जिनिंग असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, यंदा पहिल्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या बाजारात ३७ लाख ८ हजार कापूस गाठींची आवक झाली. एक कपूस गाठ १७० किलोची असते. तर मागीलवर्षी याच काळातील बाजारातील आवक ही ६२ लाख ५७ हजार गाठींवर होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजारातील आवक ही २५ लाख ४९ हजार गाठींनी कमी झाली.

Cotton
Cotton Rate : बारामती बाजार समितीत कापसाला ९००० रुपये दर

केवळ ऑक्टोबर महिन्यातील आवकेचा विचार करता ६७ टक्क्यांनी घट दिसत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात २४ लाख १० हजार गाठींची बाजारात आवक झाली होती. मात्र यंदा केवळ ७ लाख ८८ हजार गाठींवर आवक स्थिरावली.

पाकिस्तानच्या कापूस हंगामच्यादृष्टीने ऑक्टोबर हा विक्रमी कापूस आवकेचा महिना असतो. मागील हंगामात तीन महिन्यात झालेल्या एकूण आवकेपैकी तब्बल ७७ टक्के आवक एका ऑक्टोबर महिन्यात झाली होती. यंदा ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कापूस आवक कमी झाल्याने पाकिस्तानमधील कापूस पिकाचे पावसाने किती मोठे नुकसान झाले, याचा अंदाज येतो.

पाकिस्तानमधील राज्यनिहाय कापूस आवकेचा विचार करता प्रत्येक राज्यातील आवक कमी झालेली दिसते. सिंध प्रांतातील कापूस पिकाला पुराचा सर्वाधिक फटका बसला. या प्रांतात ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांमधील कापूस आवक यंदा तब्बल ५१ टक्क्यांनी कमी राहिली. गेल्यावर्षी या प्रांतात ३३ लाक २१ हजार लाख गाठी कापूस आवक झाली होती. तर यंदा केवळ १६ लाख ३५ हजार टनांवर आवक स्थिरावली.

तर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील कापूस आवक २९ टक्क्यांनी घटली आहे. यंदा पहिल्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये २० लाख ७२ हजार गाठी कापूस आवक झाली. मात्र मागील वर्षातील बाजारातील कापूस आवक २९ लाख ३५ हजार टनांवर होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com