पुणेः कापसाच्या दरात (Cotton Rate) आजही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. मात्र कापसााची आवक (Cotton Arrival) वाढलेली नाही, असं उद्योगांनी सांगितलं. आज कापसाचा किमान दर काही राज्यांमध्ये वाढला होता तर कमाल दरानेही काही ठिकाणी उसळी घेतली होती.
देशातील बाजारात दिवाळीनंतर कापसाची आवक कमी झाली. त्यामुळं बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. त्यातच उद्योगांनी आता कापसाची खेरदी सुरु केली. परिणामी कापसाची दरवाढ सुरुच आहे. सध्या कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ९ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.
आज महाराष्ट्रात कापसाला सरासरी ८ हजार ते ९ हजार २०० रुपये दर मिळाला. तर कर्नाटकात ८ हजार ५०० ते ९ हजार ९०० रुपये आणि, गुजरातमध्ये ८ हजार ते ९ हजार ३०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. उत्तरेतील हरियाना, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील सरासरी दर हा ८ हजार ते ९ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता.
कापूस खंडीचा विचार करता आज गुजरातमध्ये प्रतिखंडी ६५ हजार ते ६७ हजार रुपयाने व्यवहार झाले. एक कापूस खंडी ३५६ किलो रुईची असते. महाराष्ट्रात कापूस खंडीचा भाव ६६ हजार ५०० रुपये ते ६९ हजार रुपयांवर होता. तर उत्तरेतील दराने ६२ हजार ते ६६ हजारांचा टप्पा गाठला होता. कर्नाटकात ६७ हजार ते ७५ हजार रुपये प्रतिखंडीचा दर मिळाला.
सरकीच्या दराचा विचार करता आज ३ हजार ६०० ते ४ हजार ५०० रुपयाने सरकीचे व्यवहार झाले. आज मध्य प्रदेशात सरकीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ६०० ते ३ हजार ९०० रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्रातील दराने ३ हजार ७०० ते ४ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. गुजरातमध्येही ३ हजार ७५० ते ४ हजार १०० रुपये आणि उत्तर भारतात सरकीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर वाढत आहेत. त्यामुळं देशातील कापूस दरवाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. शेतकऱ्यांना यंदा किमान सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेूऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.