Cotton Market Rate : कापसाचे भाव पुन्हा कधी वाढतील ? कापसाचे भाव ३०० रुपयांपर्यंत नरमले? पुढं कसं होणार ?

Cotton Rate : कापसाच्या भावात मागील आठवड्यात नरमाई दिसून आली. अनेक बाजारात कापसाचा सरासरी भाव क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांनी कमी झालेला दिसतो.
Cotton
CottonAgrowon

Pune News : कापसाच्या भावात मागील आठवड्यात नरमाई दिसून आली. अनेक बाजारात कापसाचा सरासरी भाव क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांनी कमी झालेला दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. कापसाचे भाव नेमके कशामुळे कमी झाले? पुन्हा वाढतील की नाही? ही चिंता शेतकऱ्यांना आहे. पण सध्या कापसाचे भाव कमी होण्यामागे प्रामुख्याने तीन कारणं आहेत. 

कापसाचा भाव मागील आठवडाभरात कमी झाले. सरासरी भावपातळी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांवरून सध्या ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर कमाल भावही नरमलेला दिसतो. गुजरात आणि महाराष्ट्रातील कमाल भाव ८ हजार २०० रुपयांवरून १०० रुपयांनी कमी झाला. तर कापसाचा भाव सध्या हमीभावादरम्यान आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कापसाचा भाव क्विंटलामागं २०० ते ३०० रुपयांनी कमी झाला. 

Cotton
Cotton Crop : जिरायती कापसाचे पीक यंदाही तोट्यातच

कापसाच्या भावातील चढ उताराची चर्चा बाजारात आधीच सुरु होती. याचं मुख्य कारण आहे मार्च एन्डचे. मार्च एन्डमुळे आपले खाते नवं जूनं करण्यासाठी व्यापारी आणि उद्योग व्यवहार कमी करतात किंवा बंद करतात. मिळालेल्या ऑर्डर्स तर पूर्ण करण्याच लागतात. पण दरवर्षी ही स्थिती आपल्याला दिसून येत असते. दुसरं कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेले चढ उतार. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. केवळ वायदेच नाही तर प्रत्यक्ष कापूस खरेदीचा भावही काहीसा नरमला. याचा परिणाम आपल्याला देशातील बाजारावर दिसून येतो. 

Cotton
Cotton Market Rate : कापूस उत्पादनाचा अंदाज १५ लाख गाठींनी वाढवला; भावपातळी मात्र कायम राहणार

तिसरं महत्वाचं कारण आहे, देशातील कापसाचे वाढलेले अंदाज. मागील आठवड्यात महत्वाच्या तीन संस्थांनी देशाच्या कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवले. अमेरिकेचा कृषी विभाग, कापूस वापर आणि उत्पादन समिती म्हणजेच सीसीपीसी आणि काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया, या तीन संस्थांनी भारताच्या कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवले. याचाही परिणाम तात्पुरता का होईना बाजारावर दिसून येत आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले तरी अद्यापही देशातील कापसापेक्षा जास्तच आहेत. सध्या भारताच्या रुईचा भाव ९० ते ९४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव ९७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होता. त्यामुळे भारताच्या कापसाला निर्यातीसाठी आणखी मागणी आहे. तसेच भारताच्या सूत आणि कापडालाही उठाव मिळत आहे. सध्या मार्च एन्डमुळे व्यवहार काहीसे थंडावले असले तरी एप्रिलपासून व्यवहार पुन्हा पूर्वपदावर येतील. 

एप्रिलमध्ये कापूस, सूत आणि कापडाचा उठाव पूर्वीच्या पातळीवर येऊ शकतो. त्यामुळे कापसाच्या भावातील नरमाई थांबून भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भावपातळी पुन्हा आधीच्या पातळीवर पोहचू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com