Parbhani News : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोनअंतर्गत सोमवार (ता. २)पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून १० लाख ६४ हजार १०८ क्विंटल व भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल व कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यांत खासगी व सीसीआय मिळून एकूण ११ लाख ३६ हजार ५१९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
परभणी व हिंगोली जिल्ह्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलावाद्वारे खासगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी केली जात आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समिती अंतर्गत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये १० लाख ३ हजार २७३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्यांतर्गंतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ६५ हजार ११९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून १० लाख ६८ हजार ३९२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७७०० ते ८११० रुपये दर मिळाले.
भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ६३ हजार १३३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे १ हजार २८३ क्विंटल शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ) येथील केंद्रावर ३ हजार ७०२ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयीची या दोन जिल्ह्यांतील ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.
खासगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी
परभणी ७ १५३८०२
जिंतूर ४ १३७५५९
बोरी १ ४५४५५
सेलू ६ २४०६३२
मानवत १३ ३२१७५७
पाथरी २ २०५५५
सोनपेठ १ २७१२६
गंगाखेड ३ १७४१३
ताडकळस २ ३८९७४
हिंगोली ३ ५९६९५
आखाडा बाळापूर १ ५४२४
सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
केंद्र ठिकाण कापूस खरेदी
जिंतूर १३५६९
बोरी ११८७७
सेलू १६७८०
मानवत २०१९३
ताडकळस ७१४
हिंगोली १२८३
शिरडशहापूर ३७०२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.