Chana Rate : भारतीय बाजारात हरभरा दर पोहचले हमीभावाच्या खाली

Chana Market : देशांतर्गत हरभरा उत्पादकता प्रभावीत होत दरात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. त्याच कारणामुळे ऑस्ट्रेलियातून सुमारे ११ लाख टन हरभरा आयातीला मंजुरी देण्यात आली होती.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : देशांतर्गत हरभरा उत्पादकता प्रभावीत होत दरात तेजी येईल, अशी अपेक्षा होती. त्याच कारणामुळे ऑस्ट्रेलियातून सुमारे ११ लाख टन हरभरा आयातीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता भारतीय बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने आयातदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भारतात २०२४-२५ या वर्षात हरभऱ्याला ५४४० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर २०२५-२६ या वर्षात हमीभावात २१० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानुसार यंदाच्या हंगामात ५५६० रुपये असा हमीभाव हरभऱ्याला आहे. २०१७-१८ या वर्षात देशात ११.२३ दशलक्ष टन अशी विक्रमी हरभरा उत्पादकता नोंदविण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने हरभरा उत्पादकता वाढीस लागल्याचे निरीक्षण आहे. त्यामध्ये व्यवस्थापन पद्धतीत बदल तसेच सुधारित वाण अशी कारणे आहेत.

२०२१-२२ या वर्षात १०.९१ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रातून १३.७५ दशलक्ष टन इतकी उत्पादकता नोंदविण्यात आली. हरभरा उत्पादकतेत महाराष्ट्राचा २५.९७, मध्य प्रदेश १८.५९, राजस्थान २०.६५, गुजरात १०.१० तर उत्तर प्रदेशचा ५.६४ टक्‍के वाटा आहे. मात्र यंदाच्या हंगामात नैसर्गिक कारणांमुळे उत्पादकता प्रभावीत होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती.

Chana Market
Chana Production : रब्बीत एक लाख हेक्टरवर हरभरा उत्पादन

त्याच कारणामुळे हरभरा बाजार तेजीत राहील, असेही संकेत असल्याने केंद्र सरकारकडून मिळालेल्या आयातशुल्क मुक्‍त व्यापार संधीचे सोने करीत व्यापाऱ्यांनी ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात करारावर भर दिला होता. २०२४ या वर्षातील पहिल्या सहामाहित सुमारे ११ लाख टन हरभरा आयात करार झाले. आता मात्र रबी हंगामातील हरभरा आवक होण्यास सुरुवात झाली असतानाच भारतीय बाजारात हरभरा दर दबावात आले आहेत.

शेगाव (बुलडाणा) बाजार समितीत सरासरी ४२५ क्‍विंटल आवक होत ५०२० ते ५४५० या दराने व्यवहार झाले. तीन हजार क्‍विंटलवर आवक असलेल्या कारंजा लाड (वाशीम) बाजार समितीत आवक तीन हजार क्‍विंटल, तर दर ५१५० ते ५३०० रुपये क्‍विंटल असे होते. परिणामी, दर हमीभावापेक्षा कमी असल्याने आयात सौदे करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये सद्यःस्थितीत अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

Chana Market
Chana Harvesting : अकोल्यात हरभरा पीक काढणीला येऊ लागला वेग

एकूण ११ लाख टन पैकी २.२५ लाख टन आयात यामुळे धोक्‍यात आल्याचाही दावा केला जात आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियात नव्या हरभऱ्याची आवक होताच भारतीय खरेदीदार त्यावर तुटून पडले होते. पाहता-पाहता मोठ्या प्रमाणावर खरेदीचे करार करण्यात आले.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात हरभरा उत्पादन २०२४-२५ या वर्षातील हंगामात तीन पट वाढण्याचे संकेत आहेत. त्यातच आता भारतीय आयातदारांकडून सौदयांबाबत अनिश्‍चितता असल्याने दर कमी करण्यासंदर्भाने दोन्ही देशातील व्यापाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. दराबाबत भारतीय खरेदीदार दबावही टाकत असल्याचे वृत्त आहे.

अमरावती बाजारात वाढली आवक

देशांतर्गत बाजारात हरभरा आवक वाढती आहे. विदर्भातील अमरावती बाजार समितीत सध्या रोजची सरासरी आवक ही सात हजार क्‍विंटलवर पोहोचल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. या बाजार समितीत हरभऱ्याला ५४०० ते ५८२५ रुपये क्‍विंटल असा दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com