Raisin Price: बेदाण्याच्या दरात मोठी सुधारणा

Raisin Market Trend: राज्यात यंदा उत्पादन घटल्याने बेदाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे बाजारात दर झपाट्याने वाढत असून, शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरतेय.
Raisin
RaisinAgrowon
Published on
Updated on

Sangli News: यंदा उत्पादन घटल्याने बाजारात बेदाण्याचा तुटवडा भासू लागला असून उठावही अपेक्षित होत आहेत. बेदाण्याच्या दरात टप्प्याटप्प्यांनी वाढ झाली आहे. वीस दिवसांत तब्बल प्रति किलोस ७० ते ८० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरात मोठी सुधारणा झाल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या बेदाण्याला १४० रुपयांपासून ते ३५० रुपयापर्यंत दर मिळत आहे. बेदाण्याचा तुटवडा असल्याने येत्या काळातही दर वाढतील असा अंदाज बेदाण्या उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

राज्यात १ लाख ५० टन बेदाण्याचे उत्पादन झाले असल्याचे ग्राह्य धरले जात आहे. मार्च-एप्रिल महिन्यात बेदाणा विक्रीचा हंगाम सुरी झाला. या दोन महिन्यात सुमारे ३ हजार टन बेदाणा विक्रीसाठी शेतकरी बाजारात घेईन येत होता. दर चांगले असल्याने बेदाण्याचा उठावही झाला. त्यानंतर बेदाण्याची आवक काहीशी मंदावली होती. सांगली, तासगाव बाजारात ३०० ते ५०० टन, तर पंढरपूरमध्ये ४०० टन आवक आणि विक्री होऊ लागली.

Raisin
Raisin Rate: बेदाण्याचे दर स्थिर

विक्रीचा हंगाम सुरू झाल्यापासून अंदाजे ८५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. त्यापैकी मे अखेर ५० टन विक्री झाली. गेल्या वीस दिवसांत सुमारे ३५ हजार टनांची विक्री झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सद्यःस्थितीला सांगली बाजारात ४० गाडी (एक गाडी १० टन), तासगाव बाजारात ६० गाडी, तर पंढरपूर बाजारात ४० गाडी बेदाणा विक्रीसाठी येतो.

आजघडीला सुमारे ६५ हजार टन बेदाणा शिल्लक असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुळात उत्पादन कमी झाल्याने बाजारात बेदाण्याची आवक कमी-अधिक प्रमाणात सुरू होती. मार्च महिन्यात बेदाण्याच्या दरात प्रति किलोस ५० रुपयांची वाढ झाली. बाजारात आवक मंदावली असली तरी, बेदाण्याला मागणी आहे. तसेच बाजारात बेदाण्याचा तुटवडा भासू लागला आहे.

Raisin
Raisin Price: बेदाणा दर ५० रुपयांनी वाढले; शेतकऱ्यांना दिलासा!

बेदाण्याचे दर प्रति किलोत

हिरवा बेदाणा : २७० ते ३५०

पिवळा बेदाणा : २५० ते ३००

काळा बेदाणा : ७० ते १४०

पुरवठा होणार का?

गत वर्षीच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या हंगामात १ लाख ३४ हजार टनाने बेदाण्याचे उत्पादन घटले आहे. बेदाणा वर्षभर विक्रीचे नियोजन शेतकरी करत असतो. मात्र, यंदा दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी बेदाण्याची विक्री केली आहे. सद्यःस्थितीला ६५ हजार टन बेदाणा जरी शिल्लक असला तरी, नवा हंगाम जानेवारीत सुरू होतो. फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान तो विक्रीस बाजारात येतो. त्यामुळे नवा बेदाणा विक्रीस येईपर्यंत पुरवठा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उत्पादन कमी झाल्याने काही प्रमाणात तुटवडा असल्याने बेदाण्याचे दर वाढले आहेत. बाजारात अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे दरही वाढतील असा अंदाज आहे.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com