Chana Harvesting : अकोल्यात हरभरा पीक काढणीला येऊ लागला वेग

Chana Cultivation : रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख पीक आहे. सद्यःस्थितीत हरभऱ्याची काढणी सुरू झाली आहे.
Chana Cultivation
Chana Harvesting Agrowon
Published on
Updated on

Akola News : रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख पीक आहे. सद्यःस्थितीत हरभऱ्याची काढणी सुरू झाली आहे. एकरी उतारा पाच क्विंटलपासून काही ठिकाणी आठ ते दहा क्विंटलपर्यंतसुद्धा येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात हरभऱ्याचा समाधानकारक उतारा मिळू लागला आहे.

यंदाच्या रब्बीत जिल्ह्यात एक लाख २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झालेली आहे. यातील सुरुवातीला लागवड केलेला हरभरा बऱ्याच ठिकाणी काढून तयार झाला. यामुळे बाजारपेठांमध्ये हरभऱ्याची आवक सर्वत्र वाढतच चालली आहे.

Chana Cultivation
Chana Irrigation : भरघोस हरभरा उत्पादनासाठी पाण्याच नियोजन

अकोल्यात दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक दररोज होऊ लागली आहे. काही ठिकाणी हरभऱ्याची मळणी वेगाने होऊ लागली. तर उशिराने पेरणी झालेला हरभरा १५ मार्चपूर्वी तयार होऊन बाजारात येईल, असा अंदाज शेतकरी वर्तवीत आहेत.

यावर्षी हरभऱ्याची उत्पादकता पाच क्विंटलपासून आठ ते १० क्विंटलदरम्यान आहे. एकरी सरासरी पाच ते सहा क्विंटल उतारा मिळतो आहे. बाजारात सध्या हरभऱ्याला सरासरी सहा हजारांपर्यंत दरही मिळतो आहे. अकोल्यात हरभरा किमान साडेचार हजार आणि कमाल ६२०० पर्यंत विकतो आहे.

Chana Cultivation
Chana Production : रब्बीत एक लाख हेक्टरवर हरभरा उत्पादन

मजुरीचा दर महागला

कृषी निविष्ठांप्रमाणेच मजुरीच्या दरातही यंदा वाढ झाली. गेल्यावर्षी काही भागात २१०० रुपये एकराप्रमाणे हरभऱ्याची कापणी मजुरांनी केली होती. यंदा हाच दर २३०० ते २५०० रुपयांदरम्यान पोहोचला आहे.

परप्रांतीय मजुरांची या वेळी संख्यासुद्धा अद्याप पुरेशी आलेली नाही. त्यामुळे स्थानिक मजुरांनाच मोठी मागणी तयार झाली आहे. हरभरा पिकात कापणीसाठी यंत्राचा वापर होत नसल्याने संपूर्णपणे मजुरांवरच हे काम अवलंबून आहे. परिणामी मजुरी महागली तरी शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय दिसून येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com