Tur Market : सरकारकडे तुरीला पर्याय काय? दर पाडण्यासाठी सरकारचा आटापिटा

काही केल्या तुरीचे दर कमी होण्याचं नाव घेईना. त्यामुळं काही भागांमध्ये तुरीला पर्याय देण्याचाही सरकार विचार करु शकते, असं सांगितलं जातं. तर आयात वाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरुच आहेत. बाजारातील आवकही वाढली नाही.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Tur Rate Update : काही केल्या तुरीचे दर (Tur Rate) कमी होण्याचं नाव घेईना. त्यामुळं काही भागांमध्ये तुरीला पर्याय देण्याचाही सरकार विचार करु शकते, असं सांगितलं जातं. तर आयात वाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरुच आहेत. बाजारातील आवकही वाढली नाही.

त्यामुळं सरकारची कोंडी झाली. पण सरकार आता तुरीला मटार आणि मसूरचा पर्याय म्हणून विचार करु शकतं, अशी माहिती जाणकारांनी दिली.

तुरीचे दर तेजीत असल्याने केंद्र सरकारची झोप उडाली. काहीही करून तुरीचे भाव हमीभावाच्या दरम्यान आणायचे, असं उद्दीष्ट सरकारनं ठेवलं.

त्यासाठी केंद्राने व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि आयातदारांना त्यांच्याकडील तुरीच्या स्टाॅकची माहिती देण्याची सूचना केली. सरकारचे अधिकारी व्यापाऱ्यांसोबत बैठकीही घेत आहेत. पण सध्या त्यांच्याकडे तुरीचा स्टाॅक कमी प्रमाणात आहे.

Tur Market
Tur Processing Industry : शेतकरी कंपनीची डाळ उद्योगात गगन भरारी

देशात मागील काही वर्षांपासून तुरीचा वापर वाढला. त्यातच यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली. पण मागणी कायम आहे. त्यामुळे तुरीच्या दरात मोठी तेजी आली. तुरीची मागणी कमी करण्यासाठी सरकार इतरही काही पर्यायांचा विचार करत आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये आधी मटार आणि मसूरच्या डाळीचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. पण मटार आयात कमी झाल्यानं ही मागणी तुरीकडे वळली.

त्यामुळं सरकार तुरीची मागणी कमी करण्यासाठी कॅनाडामधून मटार आयात करून पुर्वेतील राज्यांमध्ये पुरवठा करू शकते. मटार आयातीवर बंदी नाही. पण काही अटी घातल्यानं आयात होत नाही. तर मसूरचा पुरवठा वाढविण्यावरही सरकार भर देण्याच्या विचारात आहे.

सरकारने यंदा तूर आयात वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवले. पण त्यासाठी जागितक पातळीवर तुरीची उपलब्धता कमी आहे. आफ्रिकेतील देशांमध्ये तुरीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. नवं पीक या देशांमध्ये वाढीच्या अवस्थेत आहे.

त्यामुळं आफ्रिकेतील देशांमधून होणारी निर्यात कमी होतेय. म्यानमारमधून निर्यात होतेय. पण त्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं या देशांमधून भारताला होणारी निर्यात पुढील काळात कमी होईल.

देशातील शेतकऱ्यांकडे तुरीचा स्टाॅक आहे. पण सरकार शेतकऱ्यांवर तूर विक्रीसाठी दबाव आणू शकत नाही. त्यामुळे मोठे शेतकरी अपेक्षित दर मिळाल्याशिवाय बाजारात तूर आणणार नाहीत. त्यामुळं तुरीचे दर कायम राहण्याचा अंदाज आहे.

Tur Market
Soybean, Cotton, Tur Price : सोयाबीन, कापूस, तुरीत किंमतवाढीचा कल

सध्या तुरीला बाजारात ८ हजार ते ८ हजार ८०० रुपये भाव मिळतोय. सरकार तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. तसचं सरकार कधीही स्टाॅक लिमिट लावू शकते, असं गृहित धरूनच व्यापार केला जातोय.

सध्या बाजारात तुरीची खरेदी मर्यादीत होतेय. पण आवकही कमीच असल्यानं बाजारावर दबाव नाही. दरात क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत चढ उतार सुरु आहेत. पण सरासरी दरपातळी कायम दिसते.

पुढील काळातही तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं तुरीचे दरही तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com