Soybean, Cotton, Tur Price : सोयाबीन, कापूस, तुरीत किंमतवाढीचा कल

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात २.७ टक्क्यांनी वाढून रु. १,५५९ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.६ टक्क्यांनी वाढून रु. १,५९९ वर आले आहेत.
Soybean, Cotton Rate
Soybean, Cotton RateAgrowon

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १ ते ७ एप्रिल, २०२३

Cotton, Soybean Market Update : या सप्ताहात मका, हरभरा व तूर वगळता सर्व शेतीमालांच्या किमती वाढल्या. मक्यामध्ये गेल्या सप्ताहात ९.६ टक्क्यांनी वाढ झाली होती; या सप्ताहात मक्याच्या किमती ९.४ टक्क्यांनी घसरल्या. मूग, सोयाबीन व कापूस यांच्या किमतीत वाढ झाली.

मार्च महिन्यात कापसाची आवक कमी झाली होती. मका, मूग व सोयाबीन यांची आवक पण घटली. हळदीने साप्ताहिक २१,५०० ची पातळी गाठली होती; आता ती कमी होऊ लागली आहे.

हरभरा व कांदा यांची आवक मात्र वाढत आहे. ७ एप्रिल रोजी संपणा-या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.२ टक्क्यांनी वाढून रु. ६१,४०० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा १.९ टक्क्यांनी वाढून रु. ६२,५४० वर आले आहेत. जून फ्युचर्स भावसुद्धा २.७ टक्क्यांनी वाढून रु. ६४,९४० वर आले आहेत. ऑगस्ट फ्युचर्स रु. ६३,००० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.७ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात २.७ टक्क्यांनी वाढून रु. १,५५९ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.६ टक्क्यांनी वाढून रु. १,५९९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,५६० वर आहेत.

कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत. कापसाची आवक आता कमी होत आहे. गेल्या महिन्यात किमती घसरत होत्या; आता मात्र त्या वाढत आहेत.

Soybean, Cotton Rate
Cotton Market : कापूस बाजारात वाढीचा ट्रेंड

मका

NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) मार्च महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती ९.६ टक्क्यांनी वाढून रु. २,३४६ वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या ९.४ टक्क्यांनी घसरून रु. २,१२५ वर आल्या आहेत.

फ्युचर्स (मे डिलिवरी) किमतीसुद्धा १.५ टक्क्यांनी घसरून रु. २,३०८ वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,३३७ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १० टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निझामाबाद, सांगली) किमती मार्च महिन्यात रु. ६,७९० ते रु. ७,००० या दरम्यान हेलकावे खात होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. ६,९०१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,९५६ वर आल्या आहेत. मे फ्युचर्स किमती १ टक्क्यांनी वाढून रु. ७,०२४ वर आल्या आहेत.

जून फ्युचर्स किमती रु. ७,१४८ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. आवक गेल्या महिन्याच्या मध्यापर्यंत वाढत होती; नंतर ती परत कमी होत आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात ती लक्षणीय कमी झाली.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,००० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्का घसरून रु. ४,९५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

Soybean, Cotton Rate
Maize Cultivation : चंद्रपुरमधील मूल तालुक्‍यात २०० हेक्‍टरवर मका लागवड

मूग

मुगाच्या किमती मार्च महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ८,५०० वर आली होती. या सप्ताहात ती २.९ टक्क्यांनी वाढून रु. ८,७५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक घटली आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती मार्च महिन्यात घसरत होत्या. मात्र या महिन्यात त्या वाढू लागल्या आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) १.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,४२९ वर आली होती. या सप्ताहातसुद्धा ती १.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,५०५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४,३०० रू. आहे. सोयाबीनची आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात रु. ८,००० वर आली आहे. हमीभाव रु. ६,६०० आहे. तुरीची बाजार समितीतील सर्वाधिक साप्ताहिक आवक फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात होती; त्यानंतर ती घसरतआहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

लेखक - ई-मेल - arun.cqr@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com