Cotton Market : कापूस बाजारावर खरचं आवकेचा दबाव आहे का?

कापसाचा हंगाम सुरु होऊन आता सात महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला. एप्रिल महिन्याही संपला आला.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Cotton Rate : कापसाचा हंगाम (Cotton Season) सुरु होऊन आता सात महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला. एप्रिल महिन्याही संपला आला. पण शेतकऱ्यांना अद्यापही अपेक्षित दर मिळत नाही. दरात काहीसे चढ उतार होत असले तरी दरपातळी कमीच आहे. बाजारातील आवक जास्त असल्यामुळं दरावर दबाव असल्याचं सांगितलं जातं.

देशातील बाजारात सध्या कापसाच्या दरात नरमाई दिसत आहे. कापसाच्या भावात मागील महिनाभरात पुन्हा घट झाली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाचे भाव ८ हजार ३०० रुपयांच्या सरासरी पातळीवर होती.

दरात सुधारणा दिसल्यानंतर बाजारातील आवक वाढत गेली. सरासरी आवक वाढल्यानं दरात मागील दोन आठवड्यांमध्ये ३०० ते ५०० रुपयांची निरमाई आली. सध्या कापूस सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपयाने विकला जातोय. कापसाच्या दरावर दबाव आल्यानं पॅनिक सेलिंग सुरु असल्याचं शेतकरीही सांगत आहेत.

Cotton Market
Cotton Market : कापसाच्या दरावरील दबाव कायम का आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. पण देशात ज्या प्रमाणात दर नरमले एवढी नरमाई आंतरराष्ट्रीय बाजारात आली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७८ ते ८३ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान फिरत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्यानंतर त्याप्रमाणात आपल्याकडे दर वाढत नाहीत. पण आंतरराष्ट्रीय बाजारात नरमाई आली की लगेच दर कमी केले जातात.

देशातील उत्पादन यंदा नेमकं किती हे अजून स्पष्ट झाली नाही. उत्पादनाच्या आकड्यांवरून अजूनही मतभेद आहेत. यामुळेही गणित कुठतरी बिघडत असल्याची चर्चा आहे.

यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. हे खरंही आहे. काही संघटना आणि व्यापारी संस्थांनी यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला. म्हणजेच अजून मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात येईल, असं गृहीत धरलं जातं. यामुळंच बाजार दबावात ठेवला जातो.

भारताचा कापूस वापर मागील दोन वर्षांपासून वाढला आहे. यंदाही कापसाचा वापर ३११ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज आहे. तर उत्पादन ३०३ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. मागील हंगामातील शिल्लक साठा आणि आयात धरुनही पुरवठा कमीच राहणार आहे. त्यामुळं पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा कमी राहीलं. यामुळं बाजारात तेजी येण्याचा अंदाज आहे.

Cotton Market
Cotton Market : खानदेशात कापूस दरावर दबाव कायम

सध्या बाजारातील आवक जास्त आहे. दैनंदीन १ लाख २० हजार गाठी कापसाची आवक होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांकडे अजून किती माल शिल्लक आहे, यावरूनही चर्चा होताना दिसतात. पण शेतकऱ्यांकडील जास्तीत जास्त माल मे महिन्यात बाजारात येईल.

त्यामुळं शेतकरी माल विकण्याची वाट पाहिली जात आहे. कापूस सात महिन्यांपर्यंत ठेऊनही दर वाढले नसल्याने शेतकरीही पॅनिक सेलिंग करत आहेत. याचा दबाव दरावर जाणवतो.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी स्टाॅक आहे. परिणामी पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी होईल. या काळात मात्र दरात सुधारणा दिसेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com